शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

प्रभूंची सुविधा एक्स्प्रेस!

By admin | Published: February 26, 2016 4:54 AM

कोणत्याही लोकानुनयी घोषणा न करता, देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेली भारतीय रेल्वे आर्थिकदृष्ट्या सशक्त करणे आणि वर्षभरात रेल्वेने प्रवास करणाऱ्या सात अब्ज प्रवाशांचा

नवी दिल्ली : कोणत्याही लोकानुनयी घोषणा न करता, देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेली भारतीय रेल्वे आर्थिकदृष्ट्या सशक्त करणे आणि वर्षभरात रेल्वेने प्रवास करणाऱ्या सात अब्ज प्रवाशांचा प्रवास सुखकर, सुरक्षित व आनंददायी करणे असे दुहेरी उद्दिष्ट डोळ्यांपुठे ठेवत रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी गुरुवारी लोकसभेत लागोपाठ दुसरा रेल्वे अर्थसंकल्प सादर केला. ५ वर्षांत रेल्वे प्रवास प्रत्येकाला अभिमानास्पद वाटावा, अशा रीतीने रेल्वेचा कायापालट करण्याचा संकल्प सोडत प्रभूंनी कोणतीही भाडेवाढ केली नाही, हे महत्त्वाचे.बिहार आणि त्या आधी दिल्ली विधानसभेत झालेला भाजपाचा पराभव आणि या आर्थिक वर्षात आसाम, केरळ, बंगाल आदी राज्यांत होणाऱ्या विधानसभा निवडणुका, यामुळे भाडेवाढ करण्याचे रेल्वेमंत्र्यांनी टाळले असावे, अशी चर्चा संसदेत सुरू होती. पंतप्रधानांसह सर्व मंत्री व भाजपा नेत्यांनी या रेल्वे अर्थसंकल्पाचे कौतुक केले, तर काँग्रेस व अन्य विरोधी सदस्यांनी अर्थसंकल्पातून जनतेला काहीच मिळणार नसल्याची टीका केली.रेल्वेचा महसूल वाढविण्यासाठी भाडेवाढ करणे हा एकमेव आणि पुरेसा मार्ग नाही, हे सूत्र रेल्वेमंत्र्यांच्या भाषणातून प्रकर्षाने जाणवले. मात्र मालभाड्याची फेररचना करण्याचे सूतोवाच त्यांनी केले. याचा उद्देशही केवळ अधिक महसूल मिळविणे नसून, एकूणच मालवाहतूक क्षेत्रात रेल्वेच्या वाट्याची घसरण रोखून देशाच्या आर्थिक विकासाचे जोमदार इंजिन ही रास्त भूमिका वटविण्यासाठी रेल्वेला मजबूत पायांवर उभे करणे हा असेल, यावर रेल्वेमंत्र्यांनी भर दिला.कोणतेही राजकीय गणित डोळ््यापुढे ठेवून कोणत्याही अमूक ठिकाणाहून तमूक ठिकाणी धावणाऱ्या कोणत्याही नव्या गाड्या प्रभू यांनी जाहीर केल्या नाहीत. त्याऐवजी त्यांनी काही नव्या वर्गातील गाड्या सुरू करण्याची घोषणा केली. त्यात गर्दीच्या मार्गांवर पूर्णपणे अनारक्षित अशी सुपरफास्ट ‘अंत्योदय एक्स्प्रेस’, काही लांब पल्ल्याच्या गाड्यांना लावले जाणारे अनारक्षित प्रवाशांसाठीचे ‘दीन दयालू’ डबे, सर्व थर्ड एसीचे आरक्षित आसनांचे डबे असलेली ‘हमसफर’ गाडी, ताशी १३0 किलोमीटर किंवा त्याहूनही अधिक वेगाने धावणारी ‘तेजस’ गाडी, सर्व डबे वातानुकुलित असलेली व सर्वाधिक गर्दीच्या मार्गांवर फक्त रात्री धावणारी ‘उदय’ एक्स्प्रेस’ व महत्वाच्या तीर्थस्थळांची सफर घडवून आणणारी ‘आस्था सर्किट ट्रेन’ याचा समावेश आहे.प्रवासी आणि मालगाड्यांचे वेग वाढवून, प्रवासी डब्यांची रचना बदलून त्यात अधिक आसनव्यवस्था करून आणि अधिक क्षमतेची इंजिने व वाघिणी वापरून आहे त्याच रेल्वेमार्गांवर जास्तीत जास्त प्रवासी आणि मालाची वाहतूक करण्याचे अनेक उपायही रेल्वेमंत्र्यांनी विषद केले. आहे ताच डोलारा कसाबसा चालविण्यावर बहुतांश खर्च होत असल्याने नव्या भांडवली गुंतवणुकीसाठी पैसा नाही, या दुष्टचक्रातून रेल्वेला बाहेर काढण्याच्या दिशेने ठोस वाटचाल, हेही प्रभूंच्या या अर्थसंकल्पाचे आणखी एक गुणवैशिष्ट्य. यासाठी रेल्वेच्या हरतऱ्हेच्या मालमत्तांमधून विशुद्ध व्यापारी दृष्टिकोन ठेवून जास्तीत जास्त पैसा उभा करणे व भांडवली निधीसाठी केवळ स्वत:च्या क्षमतेवर अवलंबून न राहता वित्तउभारणीचे नाविन्यपूर्ण मार्ग चोखाळून अनेक नव्या योजना राबविण्याची घोषणाही प्रभूंनी केली. यात रेल्वेच्या विकासात राज्य सरकारांना भागीदार करून घेणे व खासगी उद्योग आणि वित्तीय संस्थांकडून वितसाह्य घेणे याचा समावेश आहे. महाराष्ट्रासाठी काय?पुणे-नाशिक (अंतर २६५ कि.मी. अंदाजे खर्च २४२५ कोटी), वैभववाडी-कोल्हापूर (अंतर १0७ कि.मी. अंदाजे खर्च २७५0 कोटी), इंदोर-मनमाड व्हाया मालेगाव (अंतर ३६८ कि.मी. अंदाजे खर्च ९९६८ कोटी), जेउर-आष्टी (अंतर ७८ कि.मी. अंदाजे खर्च १५६0 कोटी), लातूर-नांदेड व्हाया लोहा (अंतर १५५ कि.मी. अंदाजे खर्च १५६0 कोटी), गडचिंदूर-आदिलाबाद (अंतर ७0 कि.मी. अंदाजे खर्च १५00 कोटी), जालना-खामगाव (अंतर १५५ कि.मी. अंदाजे खर्च ३000 कोटी), दौंड-मनमाड दुपदरीकरण (अंतर २३६ कि.मी. अंदाजे खर्च १८७५ कोटी) अशा आठ नव्या लोहमार्गाच्या निर्मितीला मान्यता देण्याची घोषणा प्रभूंनी केली. याखेरीज पाचोरा-जामनेर- मलकापूर (अंतर १0४ कि.मी.), बोधन-जळकोट (अंतर ६७ कि.मी.), नरखेड -वाशिम (अंतर १३0 कि.मी.), मानवत-परळी वैजनाथ (अंतर ६७ कि.मी.), श्रीरामपूर-परळी (अंतर २३0 कि.मी.), टिटवाळा-मुरबाड (अंतर २२ कि.मी.), गुलबर्गा-लातूर (अंतर १४८ कि.मी.) या नव्या मार्गांचे सर्वेक्षण करण्याची घोषणा.अशा आहेत सुविधा...- 2020 पर्यंत सर्वांना कन्फर्म तिकिटाची व्यवस्था. - साडेचार हजारपेक्षा अधिक कोचमध्ये - 17 हजार नवे बायोटॉयलेट बसविण्यात येणार.- रेल्वे स्थानकांवरील खाद्यपदार्थाचे स्टॉल्स स्थानिकांना तसेच अनुसूचित जाती, जमाती आदींना देणार. त्यातही महिलांना ३३ टक्के आरक्षण. - वृद्ध आणि दिव्यांग (अपंग) नागरिकांसाठी सारथी सेवेअंतर्गत व्हीलचेअरची सुविधा आणि प्रत्येक प्लॅटफॉर्मवर या नागरिकांना स्वच्छतागृहाची सुविधा. - नांदेड, नाशिकसह अनेक स्थानकांचे सौंदर्यीकरण. - प्रवाशांसाठी एफ एम रेडिओ स्टेशन स्थापन करण्याचा प्रस्ताव. - लांब पल्ल्याच्या रेल्वेत तीन अनारक्षित कोच. मोबाइल चार्जिंग व पेयजलाची व्यवस्था.- पूर्णत: वातानुकूलित तीन हमसफर रेल्वे ताशी - 130 किमी वेगाने धावणार- 130किमी ताशी वेगाने धावणाऱ्या ‘तेजस’चा प्रस्ताव.- 100 स्थानकांवर वाय-फाय- 30000 नवी जैव स्वच्छतागृहे- 2000 स्थानकांवर वीस हजार स्क्रीन डिस्प्ले - 120 लोअर बर्थ ज्येष्ठ व महिलांसाठी राखीव - मुंबईत रेल्वे कॉरीडॉर : चर्चगेट-विरार आणि सीएसटी -पनवेल या रेल्वेमार्गांवर ही योजना.- रेल्वे बंधू पत्रिका आता अनेक प्रादेशिक भाषेत. नवे स्मार्ट कोच बनणार. या अंतर्गत स्वयंचलित दरवाजे, बार कोड रीडर, सूचना बोर्ड आदी सुविधा देण्यात येणार.- प्रवाशांना आरक्षण सहजपणे करता यावे, यासाठी वेबसाइट, मोबाइल अ‍ॅपवरून ई-तिकीट सुविधेचा विस्तार.------------------------------------कोणतीही दरवाढ नसलेल्या रेल्वे अर्थसंकल्पात समाजातील सर्व घटक सामावलेले आहेत. गतिमान रेल्वे देतानाच सुरक्षेवर भर दिला गेला आहे. त्यातून राष्ट्रीय वाहतुकीचे माध्यम असलेल्या रेल्वेला पुनर्संघटित आणि पुनरुज्जीवित करण्याचा उद्देश दिसून येतो. - नरेंद्र मोदी, पंतप्रधान रेल्वे अर्थसंकल्पाने काहीही न देता, लोकांची फसवणूक केली आहे. अर्थसंकल्पात सुरक्षेच्या मुद्द्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. अर्थसंकल्प रुळावरून घसरला आहे. त्यात नवे काहीही नाही.- लालूप्रसाद यादव, माजी रेल्वेमंत्री