नवी दिल्ली : राष्ट्रीय महामार्गावर तुमच्यासाठी खास सुविधा सुरू केली आहे. राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करताना आता गरज पडल्यास पेट्रोल पंप, टोल प्लाझा किंवा हॉस्पिटल किती अंतरावर आहे, हे कोणाला विचारण्याची गरज नाही. एवढेच नाही तर महामार्गावर पुढे हवामान कसे असेल, हेही समजणार आहे. तसेच, प्रवासादरम्यान कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास तातडीने मदतही मिळू शकेल.
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) लोकांना प्रवास करताना एक नवीन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. एनएचएआयने 'राजमार्गयात्रा' हे मोबाईल अॅप्लिकेशन लाँच केले आहे. वाहन चालक हे अॅप गुगल प्ले स्टोअर आणि आयओएस अॅप स्टोअर या दोन्हीवरून डाउनलोड करू शकतात, ज्यामुळे प्रवाशांना विविध माहिती मिळेल तसेच तक्रारींचे निराकरण होईल. हे अॅप सध्या हिंदी आणि इंग्रजीमध्ये उपलब्ध आहे.
राष्ट्रीय महामार्ग युजर्सना एकाच ठिकाणी आवश्यक माहिती देण्याचे काम 'राजमार्गयात्रा' करणार आहे. रिअल-टाइम हवामान, वेळेवर प्रसारित सूचना आणि जवळपासच्या टोल प्लाझा, पेट्रोल पंप, रुग्णालये, हॉटेल्स आणि इतर आवश्यक सेवांबद्दल माहिती प्रदान करते. प्रवासादरम्यान उद्भवल्यास या अॅपच्या मदतीने समस्या सोडवता येऊ शकतात. जिओ-टॅग केलेले व्हिडिओ किंवा फोटो संलग्न करून वापरकर्ते सहजपणे महामार्गाशी संबंधित समस्यांची तक्रार करू शकतात.
नोंदणीकृत तक्रारींचा निपटारा कालबद्ध पद्धतीने केला जाईल, कोणत्याही विलंबाच्या बाबतीत, सिस्टम-जनरेटेड प्रकरण उच्च अधिकाऱ्यांकडे पाठवले जाईल. युजर्स पूर्ण पारदर्शकतेसाठी आपल्या तक्रारींची स्थिती देखील पाहू शकतात. 'राजमार्गयात्रा' अॅपने आपल्या सेवा विविध बँक पोर्टल्ससह एकत्रित केल्या आहेत, ज्यामुळे युजर्सना आपला FASTag सहज रिचार्ज करू शकतो, मासिक पास मिळू शकतो आणि एकाच प्लॅटफॉर्मवर इतर FASTag-संबंधित बँकिंग सेवांपर्यंत पोहोचू शकते.
अँड्राईड लिंक : https://play.google.com/store/apps/details?id=com.nhai.rajmargyatra&hl=en_US
आयओएस लिंक :https://apps.apple.com/in/app/rajmargyatra/id6449488412