नवी दिल्ली : गुप्तचर संस्थांच्या इशाऱ्यानुसार भारताने चीनच्या तीन पत्रकारांची हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतला आहे. चीनच्या पत्रकारांना अशा पद्धतीने भारत सोडण्यास सांगण्याची ही पहिलीच वेळ असावी. या तिघांच्या व्हिसाला मुदतवाढ न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिन्हुआ या चीन सरकारच्या वृत्तसंस्थेचे दिल्लीतील ब्युरो प्रमुख वून क्वियांग आणि मुंबईतील त्यांचे दोन सहकारी लू तांग आणि शी योगांग यांना ३१ जुलैपर्यंत भारत सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असे सूत्रांनी सांगितले. गुप्तचर संस्थांच्या अहवालानुसार, सरकारने या तिघांचा व्हिसा रद्द करण्यात आला. शिन्हुआ चीन सरकारचे मुखपत्र असून, चीनमध्ये या संस्थेचा मोठा प्रभाव आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
तीन चिनी पत्रकारांची भारताकडून हकालपट्टी
By admin | Published: July 25, 2016 3:46 AM