पाणी मागणी अर्जाला मुदतवाढ
By admin | Published: July 31, 2015 10:25 PM
स्नेहलता कोल्हे यांची माहिती
स्नेहलता कोल्हे यांची माहितीकोपरगाव : कोपरगाव व राहाता तालुक्यातील ज्या शेतकर्यांनी पाणी मागणी अर्ज भरलेले नाहीत, त्यांच्यासाठी मुदतवाढ देण्याचा आदेश जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांनी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांना दिला आहे़ त्यामुळे पाणी मागणी अर्ज भरण्यास मुदतवाढ मिळल्याची माहिती आमदार स्नेहलता कोल्हे यांनी दिली़कोपरगाव व राहाता तालुक्यात पावसाने ओढ दिल्याने येथील फळबागा, ऊस, खरीप पिके धोक्यात आली आहेत़ तेव्हा गोदावरी कालव्यांना तातडीने पिण्याचे पाण्याबरोबरच शेती पाण्याचे आर्वतन सोडण्यात यावे, अशी मागणी आमदार स्नेहलता कोल्हे व संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांच्याकडे केली होती़ त्यावर त्यांनी हा आदेश काढल्याचे कोल्हे यांनी सांगितले़गोदावरी कालव्यांना पिण्याच्या पाण्याबरोबरच शेतीसाठी आवर्तन सोडण्यात यावे तसेच ओव्हरफ्लोच्या पाण्याने गावतळी, शेततळी, बंधारे भरून द्यावेत, अशी मागणी आ़ स्नेहलता कोल्हे यांनी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्याकडे बुधवारच्या भेटीत केली़ त्यावेळी मंत्री महाजन यांनी पाटबंधारे खात्याचे अधिकारी, सचिव व मुख्य अभियंता यांच्याबरोबर चर्चा करून या मागणीस तत्वत: माण्यता दिली़ नाशिक पाटबंधारे खात्याने शेतकर्यांना पाणी मागणीचे अर्ज भरून देण्यासाठी अवघ्या दोन दिवसांची मुदत दिली होती़ त्यामुळे बहुसंख्य लाभधारक शेतकरी या संधीपासून वंचित राहिलेले होते़ पाणी मागणीचे अर्ज भरण्यास मुदतवाढ मिळाल्यामुळे शेतकर्यांना पाणी मिळणार आहे, असे आ़ कोल्हे यांनी सांगितले़चौकट-रविवार पासून आवर्तनगोदावरी कालव्यांना पिण्याच्या पाण्याबरोबच शेती पाण्याचे आवर्तन रविवार दि़ २ ऑगस्ट पासून सुरू करण्याचे आदेश जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक मोहन बिरासदार यांना शुक्रवारी दिले़