शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
4
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
5
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
6
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
7
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
8
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
10
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
11
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
12
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
13
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
14
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
15
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
16
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
17
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
18
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
19
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
20
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप

रिझर्व्ह बँकेला व्यापक अधिकार

By admin | Published: May 06, 2017 12:33 AM

राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी शुक्रवारी बँकिंग नियमन (दुरुस्ती) अध्यादेश २०१७ ला मंजुरी दिली. फसलेले कर्ज वसुल करण्यासाठी

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी शुक्रवारी बँकिंग नियमन (दुरुस्ती) अध्यादेश २०१७ ला मंजुरी दिली. फसलेले कर्ज वसुल करण्यासाठी रिझर्व्ह बँकेला या माध्यमातून व्यापक अधिकार देण्यात आले आहेत. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांकडे अनुत्पादित कर्ज (एनपीए) सहा लाख कोटींपेक्षा अधिक आहे. यातील बहुतांश कर्ज वीज, स्टील, रस्ते योजना आणि कापड क्षेत्रात आहेत. एनपीएच्या समस्येतून मार्ग काढण्यासाठी बहुप्रतीक्षित दुरुस्ती अध्यादेशाला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी मंजुरी दिली आहे. या अध्यादेशानुसार आता कर्ज वसूल न होण्याच्या परिस्थितीत एखाद्या बँकींग कंपनीला अथवा बँकींग कंपन्यांना दिवाळखोरी प्रक्रिया सुरु करण्यासाठी निर्देश देण्याचे अधिकार रिझर्व्ह बँकेला देण्यात आले आहेत. फसलेल्या कर्जाबाबत तोडगा काढण्यासाठी निर्देश जारी करण्याचे अधिकार आता रिझर्व्ह बँकेला देण्यात आले आहेत. विविध क्षेत्रातील निगराणीसाठी समिती स्थापन करण्याचे अधिकारही रिझर्व्ह बँकेला देण्यात आले आहेत. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मार्चमध्ये स्पष्ट केले होते की, एनपीएच्या प्रकरणांच्या तपासणीसाठी रिझर्व्ह बँकेच्या अंतर्गत समिती स्थापन करण्याबाबत विचार सुरु आहे. दरम्यान, विविध बँकांनी रिझर्व्ह बँकेला पाठविलेल्या एनपीएच्या प्रकरणांचा अभ्यास करण्यासाठी रिझर्व्ह बँकेने एक समिती स्थापन केली आहे. नव्या अध्यादेशामुळे आता बँकींग क्षेत्रातील एनपीए कमी करण्यासाठी सरकारकडून सुरु असलेल्या प्रयत्नांना मदत मिळणार आहे. या अध्यादेशात बँकींग नियमन कायदा १९४९ चे कलम ३५ ए मध्ये दुरुस्ती करुन यात कलम ३५ एए व कलम ३५ एबीचा समावेश करण्यात आला आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात हे विधेयक मंजुरीसाठी सादर करण्यात येईल. फसलेल्या कर्जावर तोडगा निघेल नव्या अध्यादेशामुळे फसलेल्या कर्जाबाबत तोडगा निघू शकेल. हा अध्यादेश पुढचा मार्ग निश्चित करेल, असा विश्वास आरबीआयचे कार्यकारी संचालक सुदर्शन सेन यांनी व्यक्त केला आहे. या अधिकाऱ्याने स्पष्ट केले की, सरकार आणि रिझर्व्ह बँक फसलेल्या कर्जाबाबत मार्ग काढण्यासाठी एकत्रितपणे काम करत आहेत. पण, या अध्यादेशामुळे या प्रक्रियेला नवी दिशा मिळणार आहे. हा अतिशय महत्वपूर्ण निर्णय आहे. अर्थात, अशा प्रकरणात रात्रीतून काही घडत नसते. ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. एनपीची समस्या कठीण आहे. पण, हा प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. रिझर्व्ह बँकेला व्यापक अधिकार : जेटली अनुत्पादित कर्जाची (एनपीए) ओळख करणे आणि त्यावर तोडगा काढणे यासाठी रिझर्व्ह बँकेला व्यापक अधिकार देण्यात आले आहेत. यासाठी बँकींग कायद्यात दुरुस्ती करण्यात आली आहे, अशी माहिती अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिली. दिवाळखोरीची प्रक्रीया सुरु करण्याचे अधिकार आता रिझर्व्ह बँकेला देण्यात आले आहेत. जेटली म्हणाले की, अनुत्पादित वा तत्सम संपत्तीची यादी रिझर्व्ह बँकेकडे आहे. एनपीए प्रकरणात रिझर्व्ह बँकेला अधिक सशक्त करण्याची गरज आहे. संपत्तीची विक्री करणे, नफ्यात नसणाऱ्या शाखा बंद करणे, अतिरिक्त खर्चात कपात करणे हा बदलाच्या प्रक्रियेचा भाग आहे. दरम्यान, बँकांचा एनपीए त्यांच्या एकूण कर्जाच्या १७ टक्के पर्यंत पोहचला आहे. जगातील मोठ्या अर्थव्यवस्थेतील एनपीएचा हा उच्च स्तर आहे.‘तीन सी’ची भीती एनपीएचा प्रश्न हाताळताना बँकांना नेहमीच तीन सीची भीती वाटत आलेली आहे. सीबीआय, सीएजी आणि सीव्हीसी हे ते तीन सी आहेत.मात्र, आता अध्यादेशातील दुरुस्तीनंतर आरबीआयला विशेष अधिकार मिळाले आहेत. त्यामुळे असे प्रकरणे हाताळताना आरबीआय अधिक सक्षम ठरणार आहे. मात्र, आता अध्यादेशातील दुरुस्तीनंतर आरबीआयला विशेष अधिकार मिळाले आहेत. त्यामुळे असे प्रकरणे हाताळताना आरबीआय अधिक सक्षम ठरणार आहे.