शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

खासदार पप्पू यादव यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल; म्हणाले, "जो दोषी असेल त्याला फाशी द्यावी"

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2024 8:13 AM

पूर्णियातील एका मोठ्या फर्निचर व्यावसायिकाने खासदार पप्पू यादव यांच्यावर एक कोटी रुपयांची मागणी केल्याचा आरोप केला आहे.

पूर्णिया : नुकताच लोकसभा निवडणूक निकाल जाहीर झाला. भाजप प्रणित 'एनडीए'ला बहुमत मिळाले. त्यामुळे 'एनडीए' सरकार स्थापन झालं आहे. दरम्यान, बिहारमधील पूर्णियामधून अपक्ष निवडणूक जिंकलेल्या पप्पू यादव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पूर्णियातील एका मोठ्या फर्निचर व्यावसायिकाने खासदार पप्पू यादव यांच्यावर एक कोटी रुपयांची मागणी केल्याचा आरोप केला आहे.

पूर्णिया पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फर्निचर व्यावसायिकाने तक्रारीत म्हटले आहे की, ४ जून रोजी मतमोजणीच्या दिवशी पप्पू यादव यांनी व्यावसायिकाला आपल्या घरी बोलावले होते. जेव्हा व्यावसायिक हे पप्पू यादव यांच्या घरी गेले, तेव्हा त्यांच्याकडे पप्पू यादव यांनी एक कोटी रुपये मागितले. तसेच, पप्पू यादव यांनी केवळ पैसेच मागितले नाही तर व्यावसायिकाला धमकावल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

पैसे दिले नाही तर ठार मारले जाईल, अशी धमकी पप्पू यादव यांनी दिल्याचे म्हटले आहे. याशिवाय, पप्पू यादव यांनी पुढील पाच वर्षे पूर्णियाचा खासदार राहणार असल्याचे सांगत आपल्या म्हणण्याप्रमाणे वागण्यास सांगितल्याचे व्यावसायिकाने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, एका फर्निचर व्यावसायिकाच्या तक्रारीनंतर अपक्ष खासदार पप्पू यादव आणि त्यांचे निकटवर्तीय अमित यादव यांच्याविरोधात मोफसिल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

काय म्हणाले पप्पू यादव?गुन्हा दाखल झाल्यानंतर पप्पू यादव यांनी ट्विटद्वारे प्रतिक्रिया दिल्याचे समोर आले आहे. देशाच्या राजकारणातील माझा वाढता प्रभाव आणि सर्वसामान्यांच्या वाढत्या आपुलकीमुळे नाराज झालेल्या लोकांनी आज पूर्णियामध्ये एक घृणास्पद कट रचला आहे. एका अधिकाऱ्याचे आणि विरोधकांचे हे षडयंत्र पूर्णपणे उघड होईल. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या अंतर्गत निष्पक्ष तपास व्हावा आणि जो दोषी असेल त्याला फाशी द्यावी, असे पप्पू यादव यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Biharबिहारlok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Crime Newsगुन्हेगारी