नवी दिल्ली : लांब पल्ल्याच्या प्रवासी गाड्यांना आणखी ३एसी डबे जोडण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. वातानुकूलित डब्यांची मागणी वाढत चालल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. १ एप्रिल २0१६ आणि १0 मार्च २0१७ या काळात ३एसी डब्यांनी एकूण प्रवासी वाहतुकीपैकी १७ टक्के वाहतूक केली. ही वाहतूक प्रामुख्याने लांब पल्ल्याच्या रेल्वेमध्ये झाली. एकूण प्रवासी उत्पन्नाच्या तुलनेत ३एसी डब्यांचे उत्पन्नही वाढले आहे.कल बदलत चाललारेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, शयनयान श्रेणीतील प्रवासाचा कल कमी होत चालला असून, अधिकाधिक प्रवासी आता ३एसी श्रेणीला प्राधान्य देत आहेत. मागणी वाढल्यामुळे लांब पल्ल्यांच्या गाड्यांत ३एसी डब्यांची संख्या वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अलीकडे रेल्वेने हमसफर एक्स्प्रेस सुरू केली आहे.
लांब पल्ल्याच्या गाड्यांना थर्ड एसीचे जादा डबे
By admin | Published: April 23, 2017 12:55 AM