दापोरा नदी पात्रातून वाळूचा प्रचंड उपसा
By admin | Published: August 23, 2016 7:43 PM
दापोरा - गिरणा नदीच्या पात्रातून वाळूचा प्रचंड उपसा रात्रंदिवस सुरू असून रात्रीच्या वेळी तर या कामाला प्रचंड वेग येत असतो. दापोरा गटातून वाळू गटाचा कोणताही लिलाव नसताना हा उपसा करण्यात येत असून परिणामी नदी पात्रात मोठमोठे खड्डे पडले आहेत. नदी पात्रातून येणारा रस्ता हा गावातून आहे. त्यामुळे रात्रंदिवस छोट्याछोट्या रस्त्यांवरून डंपर, ट्रॅक्टर भरधाव जात-येत असतात. यामुळे अपघाताची शक्यता लक्षात घेऊन या प्रश्नी त्वरित कारवाई केली जावी अशी मागणी होत आहे.
दापोरा - गिरणा नदीच्या पात्रातून वाळूचा प्रचंड उपसा रात्रंदिवस सुरू असून रात्रीच्या वेळी तर या कामाला प्रचंड वेग येत असतो. दापोरा गटातून वाळू गटाचा कोणताही लिलाव नसताना हा उपसा करण्यात येत असून परिणामी नदी पात्रात मोठमोठे खड्डे पडले आहेत. नदी पात्रातून येणारा रस्ता हा गावातून आहे. त्यामुळे रात्रंदिवस छोट्याछोट्या रस्त्यांवरून डंपर, ट्रॅक्टर भरधाव जात-येत असतात. यामुळे अपघाताची शक्यता लक्षात घेऊन या प्रश्नी त्वरित कारवाई केली जावी अशी मागणी होत आहे. मंगळे विद्या मंदिरातसांस्कृतिक कार्यक्रमजळगाव - लक्ष्मीबाई खंडू मंगळे प्राथमिक विद्यामंदिरात विविध सांस्कृतिक कार्यक्रम नुकतेच पार पडले. आर्किटेक्ट अरुण भोळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी शाळेस क्रीडा साहित्य दिले. तर सामाजिक कार्यकर्ते अहमद खान यांनी गणवेश तर पराग कोचुरे यांनी शालेय पुस्तकांचे वाटप केले. संस्थेचे अध्यक्ष शिवदास मंगळे, उपाध्यक्ष मोरे उपस्थित होते. सामाजिक कार्यकर्त्या कलावती पाटील यांनी मार्गदर्शन केले. प्रोग्रेसिव्ह किंडर गार्टनतर्फे रंगभरण स्पर्धाजळगाव - प्रोग्रेसिव्ह किंडर गार्टन शाळेत विद्यार्थ्यांसाठी रंगभरण स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत वैष्णवी वाजपेयी, कशिश परवाले, हर्षल शिंपी, दर्शिल पंडित, आराध्या महाजन, कार्तिक पाटील या यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षीसे देण्यात आली. अध्यक्ष प्रेमचंद ओसवाल, अध्यक्षा मंगला दुनाखे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. शेतमजुरांच्या प्रश्नांवरआंदोलनाचा इशाराजळगाव - लाल बावटा शेतमजूर युनियनतर्फे शेतमजुरांच्या विविध प्रश्नांवर आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे भारतीय शेतमजूर युनियनचे राष्ट्रीय कमेटी सदस्य अमृत महाजन यांनी कळविले आहे. शेतमजुरांच्या विविध प्रश्नांकडे शासनाकडून दुर्लक्ष होत असून शासनाला जागे करण्यासाठी भविष्यात तीव्र आंदोलन छेडण्याचा निर्णय नाशिक येथील बैठकीत घेण्यात आल्याचे महाजन यांनी कळविले आहे.