बिहारच्या जमुईमध्ये रस्त्यावर हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला आहे. जिल्हा मुख्यालयातील जुन्या बाजारात एका विवाहितेला तिच्या प्रियकरासह बाईकवरून फिरताना पकडण्यात आले. पकडल्यावर महिला पतीसमोर खोटे बोलू लागली. आधी तिने सांगितले की बाईक चालवणारा तरुण तिचा भावोजी आहे, पण नंतर तिने तिच्या पतीवर घरगुती हिंसाचार आणि छळाचा आरोप केला. वाद वाढल्यानंतर पोलिसांनी तेथे पोहोचून दोघांना समज देऊन शांत केले.
मिळालेल्या माहितीनुसार, जमुई पोलीस स्टेशन परिसरातील भाटचक येथील रहिवासी गोविंद पंडित याचा 2021 मध्ये जिल्ह्यातील गरही पोलीस स्टेशन क्षेत्रातील मुडवडो गावातील रहिवासी नीतू कुमारीसोबत विवाह झाला होता. लग्नानंतर सुरुवातीला सर्व काही सुरळीत चालले, पण हळूहळू सर्व काही बिघडू लागले. गोविंद पंडित यांनी सांगितले की, पत्नी माहेरी जात असल्याचे सांगून घरी गेली होती. दरम्यान, एके दिवशी ते काही कामानिमित्त जमुई येथे आले होते.
बाजारात पतीने पत्नी नीतू हिला दुसऱ्या तरुणासोबत बाईकवरून जाताना पाहिले आणि रंगेहाथ पकडले. पकडले गेल्यावर प्रियकराच्या प्रेमात वेडी झालेली नीतू एकामागून एक खोटं बोलू लागली. सुरुवातीला तिने आजारी असून उपचारासाठी आल्याचे सांगितले. गोविंदने थोडी कसून चौकशी केली असता तिने सांगितले की, बाईक चालवणारी व्यक्ती तिचा भावोजी आहे, परंतु जेव्हा हे नवऱ्याला पटलं नाही तेव्हा महिलेने पतीवर घरगुती हिंसाचाराचा आरोप केला.
नीतूने दिलेल्या माहितीनुसार, लग्नापासून तिचा पती गोविंद पंडित दारू पितो आणि भांडतो. म्हणूनच तिला त्याच्यासोबत राहायचे नाही. झाझा पोलीस स्टेशन हद्दीतील राजला गावातील रहिवासी सोनू कुमार याच्यासोबत तिच्या आईने लग्न ठरवलं असून ती त्याच तरुणासोबत जात होती. महिलेने पतीसोबत राहण्यास नकार दिला आहे. सध्या या घटनेची गावात जोरदार चर्चा सुरू आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.