शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
3
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
4
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
5
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
6
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
7
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
8
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
9
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
10
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
11
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
12
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
13
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
14
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
15
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
16
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
17
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
18
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
19
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
20
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू

१४ लाखांचे बक्षिस असलेल्या जहाल नक्षलवाद्यास अटक, ४५ मिनिटे चालली चकमक 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2021 11:47 PM

सोमवारी सकाळी ६ ते ७ वाजताच्या दरम्यान मालकुआ जंगलात पोलिसांना १५ ते २० नक्षलवादी आढळले. पोलिसांनी त्यांना आत्मसर्पण करण्यास सांगितले. मात्र त्यांनी पोलिसांच्या सूचनेकडे दुर्लक्ष करीत जंगलातून पळ काढण्याचा प्रयत्न केला. (An extremist Naxalite arrested)

गोंदिया - मध्य प्रदेशातील (Madhya pradesh) बालाघाट (Balaghat) जिल्ह्यात मालकुआ जंगलामध्ये पोलीस आणि नक्षलवादी यांच्यात झालेल्या चकमकीत पोलिसांना एका जहाल नक्षलवाद्यास पकडण्यात यश आले. ही कारवाई सोमवारी (दि.८) करण्यात आली. (An extremist Naxalite arrested, clash lasted for 45 minutes)

मध्यप्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील लांजी क्षेत्रातील मालकुआ जंगलात १५ ते २० नक्षलवादी असल्याची गुप्त माहिती बालाघाट पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच बालाघाट पोलिसांनी हॉकफोर्सच्या जवानांसह या जंगलात सर्च ऑपरेशन केले. सोमवारी सकाळी ६ ते ७ वाजताच्या दरम्यान मालकुआ जंगलात पोलिसांना १५ ते २० नक्षलवादी आढळले. पोलिसांनी त्यांना आत्मसर्पण करण्यास सांगितले. मात्र त्यांनी पोलिसांच्या सूचनेकडे दुर्लक्ष करीत जंगलातून पळ काढण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान हॉकफोर्सच्या जवानांनी गोळीबार केला. पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये जवळपास ४५ मिनिटे फायरिंग सुरु होती. दरम्यान नक्षलवाद्यांनी टिकाव लागत नसल्याचे पाहून जंगलातून पळ काढला. यात एका जहाल नक्षलवाद्याला पकडण्यात पोलिसांना यश आले. श्यामलाल उर्फ मोतीराम सनकू जांग धुर्वे असे त्या जहाल नक्षलवाद्याचे नाव असून तो हार्डकोर समितीचा सदस्य आहे. त्याच्यावर १४ लाख रुपयांचे बक्षीस असल्याची माहिती समोर आली आहे. तो गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्याअंतर्गत येणाऱ्या मुरमगाव कटेझरी येथील रहिवासी असल्याची माहिती पुढे आली आहे. 

श्यामलालावर ८४ गुन्हे दाखल टांडा परिसरात कमेटी सदस्य असलेला जहाल नक्षलवादी श्यामलाल उर्फ मोतीराम सनकू जांग धुर्वे याच्यावर मध्यप्रदेशात १५, छत्तीसगडमध्ये ८, महाराष्ट्रात ६१ गुन्हे दाखल आहेत. महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड राज्यातील पोलीस अनेक वर्षांपासून त्याच्या मागावर होते. श्यामलालवर बालाघाट जिल्ह्यात २०१० पोलिसाची हत्या, २०१९ मध्ये पेंद्र नामक व्यक्तीची हत्या असे अनेक गुन्हे दाखल होते. 

त्याच्या अटकेसाठी मध्यप्रदेश पोलिसांनी ३ लाख, छत्तीसगड पोलिसांनी ५ लाख आणि महाराष्ट्र पोलिसांनी ६ लाख रुपयांचे बक्षिस ठेवले होते. दरम्यान त्याला जेरबंद करण्यात अखेर बालाघाट पोलिसांना यश आले.

मालकुआ येथील कंत्राटदारांची वाहने जाळण्यात होता सहभागी - ३० जानेवारी २०२१ रोजी लांजी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या देवरबोली चौकी अंतर्गत येणाऱ्या प्रधानमंत्री ग्रामसडक विकास प्राधिकरणच्या देखरेखीत आरसीपीएलडब्लूई योजनेंतर्गत देवरबेली ते मालकुआ दरम्यान बनविल्या जात असलेल्या रस्त्याच्या कामावर ३ वाहनांना लावलेल्या आगीच्या घटनेत दलम सोबत अटकेत असलेल्या नक्षलींमध्ये श्यामलाल सुद्धा होता. मिळालेल्या माहितीनुसार, अद्याप देवरबेली क्षेत्रात मालकुआ व चिलकोना जंगलातील विकास कामांवर असलेल्या मशीन्सला जाळण्यासाठी व पोलीस पार्टीवर हल्ला करून दहशत माजविण्याच्या तयारीत नक्षली होते. मात्र नक्षली यामध्ये यशस्वी होण्यापूर्वीच पोलिसांनी त्यांना हाकलून लावल्याची माहिती पोलीस महासंचालक के.पी.व्यकंटेशवरराव, बालघाटचे पोलीस अधीक्षक अभिषेक तिवारी यांनी दिली.

टॅग्स :naxaliteनक्षलवादीMadhya Pradeshमध्य प्रदेशMaharashtraमहाराष्ट्रPoliceपोलिस