जमुई- उत्तर प्रदेशच्या अलिगढ मुस्लीम विद्यापीठात मोहम्मद अली जिनाच्या फोटोवरून वाद सुरू झालेला असतानाच आता भारताच्या सरकारी अभियानांना चालना देण्यासाठी बिहारमधील एका पुस्तकावर छापलेला एक फोटो चर्चेचा विषय ठरतो आहे. बिहारच्या जमुई जिल्ह्यातील स्वच्छता अभियानाच्या पुस्तकावर एका पाकिस्तानी मुलीचा फोटो छापल्याचा आरोप केला जातो आहे. दरम्यान, या प्रकरणी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.
दरम्यान, जिल्हाधिकारी धर्मेद्र कुमार यांनी सांगितलं की, तत्कालिन जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर नोटबूक प्रकाशित करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. पुस्तकावर छापण्यात आलेली मुलगी ही पाकिस्तानाच युनीसेफची ब्रॅण्ड अॅम्बेसेडर असल्याची बाब शुक्रवारी समोर आली.