नवी दिल्ली : देशामध्ये पुढील काही महिन्यांत विधानसभा, लोकसभा निवडणुका होऊ घातल्या असून त्याच्या तयारीसाठी फेसबुकने कंबर कसली आहे. अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत फेसबुकच्या प्लॅटफॉर्मचा गैरवापर केल्याच्या आरोपांवरून आधीच फेसबुक टीकांचे धनी झाले आहे. यामुळे जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशामध्ये निवडणुका होत असल्याने फेसबुकने खबरदारी घेण्यास सांगितले आहे.
भारतात पुढील वर्षी लोकसभा निवडणूक होणार आहे. त्याचबरोबर विधानसभा निवडणुकाही एकत्रित घेण्याचे घाटत आहे. या निवडणूक प्रक्रियेमध्ये एकूण 72 कोटींपेक्षा जास्त मतदार भाग घेणार आहेत. एवढ्या मोठ्या जनसमुदायार्पंत पोहोचण्यासाठी फेसबुक, ट्विटरसारख्या सोशलमिडियाचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जाणार आहे. यासाठी फेसबुकचे सीईओ मार्क झकरबर्ग, मुख्य कार्यकारी अधिकारी शेरिल सैंडबर्ग आणि इतर बडे अधिकारी या काळात सतर्क असणार आहेत.
फेसबुकच्या भारतातील कर्मचाऱ्यांबरोबरच कॅलिफोर्निया येथील मेन्लो पार्कच्या मुख्यालयातील शेकडो कर्मचाऱ्यांची टीम लोकसभा निवडणुकीवेळी काम करणार आहे. फेसबुकच्या व्यवस्थापक केटी हार्बट यांनी सांगितले की, भारतातील निवडणुका आमच्यासाठी महत्वाच्या आहेत. मार्क साऱ्या घटनाक्रमावर नजर ठेऊन आहेत.
फेसबुकच्या मुख्यालयामध्ये असलेली पोस्टेड हार्बट ही कंपनी जगभरातील सर्व निवडणुकांचे काम पाहते. ही टीम मागिल आठवड्यामध्ये भारतात होती. यावेळी ही टीम कंपनीतील व बाहेरील लोकांना भेटत होती. केंब्रिज एनालिटिका (सीए) स्कॅन्डलच्या मार्चमधील खुलाशानंतर लोकसभा निवडणुका या त्यांच्यासाठी सर्वात मोठे आव्हान ठरणार आहे, फेसबुकवर 2016 मधील अमेरिकेच्या निवडणुकीसह अन्य निवडणुकांना प्रभावित केल्याचा आरोप होता. फेसबुकवर खासकरुन अमेरिकामध्ये 8.7 कोटी वापरकर्त्यांच्या माहितीचा गैरवापर केल्याचा आरोप आहे. तर भारतातील 5.6 लाख मतदात्यांच्या माहितीशी छेडखानी केल्याचाही आरोप आहे.
यासाठी फेसबुक राजकीय पक्ष आणि उमेदवारांसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी आणि जाहिरातदारांच्या टीमना एकत्रित करणार आहे. फेसबुक लाईव्हचा वापर कसा करायचा, प्रोफाईल कसे बनवायचे, पासवर्ड कसा मजबुत केला जाईल याबाबत मार्गदर्शने केले जाणार आहे. तसेच फेसबुक पेज बनविणे, व्हिडिओ अपलोड करण्यासारखी कामेही सांगितली जाणार आहेत.