नवी दिल्ली : सोशल मीडियात लोकप्रिय असणा-या फेसबुक कंपनीची परिस्थिती सध्या बिकट अवस्थेत आहे. शेअर मार्केटमध्ये फेसबुकचे शेअर खाली घसरले आहेत. तर, दुसरीकडे फेसबुकवर सतत ऑनलाइन असणारे लोक आणि कंपन्यांनी आपले पेज डिलीट करत आहेत. त्याचबरोबर, या कंपन्या फक्त आपले फेसबुकवरील पेज डिलीटच करत नाहीत तर फेसबुकच्या माध्यमातून दिल्या जाणा-या जाहिराती बंद करत आहेत. सीएनबीसी डॉट कॉम या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, या आठवड्यात फेसबुकच्या उत्पन्नात जवळपास 75 अब्ज यूएस डॉलर इतका तोटा झाला आहे. यामध्ये भारतीय रुपयांच्या आकडेवारीनुसार 4875 अरब रुपयांचा तोटा फेसबुकला गेल्या आठवड्यात झाला आहे आणि अद्यापही तोटा होत आहे. याचबरोबर, शेअर मार्केटमध्ये फेसबुकचे शेअर जवळपास 13 टक्कांनी घसरले आहेत. फेसबुकच्या एका शेअरची किंमत रविवारी फक्त 159.39 यूएस डॉलर इतकी होती. दरम्यान, शेअर मार्केटमध्ये फेसबुकची अशा प्रकारची स्थिती 2012 मध्ये सुद्धा झाली नव्हती. त्यावेळी पण काही प्रमाणात घसरण झाली होती. बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार, 2012मध्ये न्यूयॉर्कमध्ये शेअरची किंमत 11 टक्कांनी घटल्याचे दिसून आले होते. त्यामुळे आतापर्यंत सर्वात खाली म्हणजेच 23.94 डॉलरवर घसरला होता. याचबरोबर, फेसबुकवर डेटाचोरीच्या प्रकरणामुळे नामुष्कीची वेळ आली आहे. याप्रकरणामुळे नामांकित कंपन्या फेसबुकवरील आपले पेज डिलीट करत आहेत. टेस्ला, स्पेस एक्स, कॉमर्ज बॅंक आणि मोजला यासारख्या कंपन्यांनी आपले फेसबुकवरील पेज डिलीट केले आहे. तसेच, अॅपल कंपनीचे सीईओ टीम कुक यांनी फेसबुकला लोकांविषयींची माहिती सुरक्षित ठेवण्याचा सल्ला दिला आहे. तसेच, गूगलवर फेसबुकवरील आपले अकाउंट कशाप्रकारे डिलीट करावे, यासाठी मोठ्याप्रमाणात सर्च करण्यात येत आहे. दरम्यान, अमेरिकेसह अनेक देशांच्या निवडणुकांमध्ये 5 कोटी फेसबुक सदस्यांचा डेटा चोरून मतदारांवर प्रभाव पाडण्याचा आरोप असणाऱ्या केम्ब्रिज अॅनालिटिका कंपनीवरुन आता भारतीय राजकारणात खडाजंगी सुरू झाली आहे. फेसबुकवरील डेटाचोरीच्या प्रकरणाने अमेरिका, इंग्लंड आणि भारतात रान उठवले असतानाच आणि त्याबद्दल फेसबुकचा सीईओ मार्क झुकेरबर्ग याने माफीही मागितली आहे.
फेसबुक लॉग इनची माहिती विकली जाते फक्त ३४० रुपयांतफेसबुकवरील डेटाचोरीच्या प्रकरणाने अमेरिका, इंग्लंड आणि भारतात रान उठवले असतानाच आणि त्याबद्दल फेसबुकचा सीईओ मार्क झुकेरबर्ग याने माफीही मागितली असताना आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आपल्यासाठी अमूल्य असणारे फेसबुकवरील लॉग इनचे डिटेल्स केवळ ३४० रुपयांना विकले जात असल्याचे एका कंपनीने निदर्शनास आणले आहे. अमेरिकेतील निवडणुकीसाठी ५ कोटी फेसबुक युजर्सचे लॉग इन डिटेल्स चोरण्यात आले होते. ही माहिती जर वरील किमतीला विकली असेल तर त्याचे मूल्य जवळपास १७०० कोटी रुपये एवढे आहे.
'स्पेस एक्स'नं FB पेज केले डिलीटफेसबुक डेटा चोरी प्रकरणानंतर ट्विटरवर एका युजरने एलॉन मस्क यांना फेसबुकवरील 'स्पेस एक्स'चे अधिकृत पेज बंद करण्याचे आव्हान दिले होते. मस्क यांनीदेखील काही वेळातच फेसबुकवरील पेज बंद करुन फेसबुकला जोर का झटका दिला आहे. 'आम्ही फेसबुकसोबत कधीही जाहिरात केलेली नाही. आमची खोटी जाहिरात करण्यासाठी आम्ही कोणाला सांगत नाही किंवा त्यासाठी कोणाची सेवा घेत नाही. माझ्या कंपन्यांची सर्व उत्पादने ही त्यांच्या दर्जामुळेच चालतात, असे त्यांनी सांगितले. फेसबुकवरील पेज डिलिट केल्याने कंपनीला फटका बसणार नाही, असेही ते म्हणाले.