ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २७ - मंगळवारी सकाळी पावणे बाराच्या सुमारास 'ऑफलाइन' गेलेल्या फेसबुक आणि इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईट्स ४० मिनीटांनी पुन्हा सुरु झाल्या आहेत. या वेबसाईट्स का बंद पडल्या होत्या हे अद्याप समजू शकलेले नाही.
मंगळवारी सकाळी ११ वाजून ५० मिनीटांनी फेसबुक आणि ट्विटर या वेबसाईट बंद पडल्या. या संकेतस्थळांवर जाण्याचा प्रयत्न केला असता 'Sorry something went wrong' असा संदेश झळकत होता. भारतासह आशिया आणि अमेरिका खंडातील युझर्सनाही हाच संदेश येत होता. या वेबसाईट क्रॅश झाल्यावर अनेकांनी ट्विटरद्वारे याविषयी नाराजी व्यक्त केली. अखेरीस ४० मिनीटांनी या दोन्ही वेबसाईट्स पूर्ववत झाल्या. या क्रॅशमागील तांत्रिक कारणांविषयी अद्याप फेसबुककडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.