शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिवसेनेत बसलेल्या सासूमध्ये प्रॉब्लेम"; शेवटच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
2
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
3
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
4
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
5
ईडी-सीबीआयच्या दबावाखाली पक्ष बदलला नाही - कैलाश गेहलोत
6
₹२२० प्रीमिअमवर पोहोचला 'हा' IPO, लिस्टिंगवर होऊ शकतो ९८ टक्क्यांचा नफा; कधी करता येईल गुंतवणूक?
7
Maharashtra Vidhan Sabha 2024: सर्वांत तरुण उमेदवार कोणत्या पक्षाचे?
8
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!
9
भाजपा नेत्यांच्या या दहा घोषणांनी बदलली प्रचाराची दिशा, निकालात ठरू शकतात निर्णायक
10
भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
11
"काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकात सोयाबीनला केवळ ३,८०० रुपयांचा भाव’’; भाजपा खासदाराने दाखवला आरसा
12
एक Home Loan घेतल्यानंतर दुसरं होम लोन घेता येतं का? जाणून घ्या काय आहे दुसऱ्या लोनची प्रोसस
13
कैलाश गेहलोत भाजपमध्ये सामील, दिल्ली निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवालांना मोठा झटका
14
लग्नसराईच्या काळात सोन्या-चांदीच्या किंतीत मोठा बदल, स्वस्त झालं की महाग? पटापट चेक करा 14 ते 24 कॅरेट सोन्याचा लेटेस्ट रेट
15
राहुल गांधींनी भर पत्रकार परिषदेत आणली तिजोरी, आतून काढली दोन पोस्टर्स अन् म्हणाले...
16
विदेशी वित्तसंस्थांच्या विक्रीचा मारा थांबणार कधी? अमेरिकेची बेरोजगारी, जपानच्या चलनवाढीकडे लक्ष
17
Maharashtra Election 2024 Live Updates: मतदानाच्या अवघ्या दोन दिवस आधी अजित पवार गटाचा मोठा निर्णय, खेळी फिरणार?
18
पक्षाध्यक्ष मी अन् यांनी कसे काय तिकीट दिले?;शरद पवारांनी उडवली अजित पवारांची खिल्ली
19
अभिनेत्री कश्मीरा शाहचा भीषण अपघात, रक्ताने माखले कपडे; नेमकं काय घडलं?
20
"कुटुंबातील महिलांमध्ये वाद निर्माण करण्याची काँग्रेसची योजना", 'गृहलक्ष्मी'वरून चित्रा वाघ यांचा निशाणा

बीएसएफ जवानांवर महिलेचे फेसबुक जाळे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2018 5:19 AM

हेरगिरी केल्याच्या आरोपावरून नोएडा येथून बुधवारी अटक करण्यात आलेला बीएसएफ जवान अच्युतानंद मिश्रा याला आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी पाकिस्तानची गुप्तहेर संस्था आयएसआयने फेसबुकचा डोकेबाज वापर केला होता.

लखनौ : हेरगिरी केल्याच्या आरोपावरून नोएडा येथून बुधवारी अटक करण्यात आलेला बीएसएफ जवान अच्युतानंद मिश्रा याला आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी पाकिस्तानची गुप्तहेर संस्था आयएसआयने फेसबुकचा डोकेबाज वापर केला होता. त्यावर एका महिलेच्या नावे बनावट खाते उघडून त्याद्वारे मिश्राने फेसबुकवर झळकविलेली छायाचित्रे व पोस्टवर लाइक्स व कमेंटचा मारा करून, संवाद साधून त्याला हेरगिरीसाठी वश करण्यात आयएसआय यशस्वी ठरली.फेसबुकवर अच्युतानंद याने झळकविलेले छायाचित्र आवडल्याचा संदेश त्याला एका अनोळखी महिलेच्या अकाऊंटवरून आला. त्यामुळे पघळून त्याने तिला मैत्रीची विनंती पाठविली. ती मंजूर होताच दोघांमध्ये संवाद सुरू झाला. त्याची फेसबुकवरील छायाचित्रे व पोस्ट यांचे कौतुक होऊ लागताच हा जवान तिच्या कह्यात गेला. मुळात ते खाते बनावट होते हे अच्युतानंदच्या लक्षात आले नाही. या खात्यातील व्यक्तीने अजून ९० भारतीयांना मित्रांच्या यादीत सामील केले होते. फेसबुकवरील बनावट खात्यांद्वारे आयएसआयने भारतात केवळ लष्करातीलच नव्हे, तर सामान्य नागरिकांनाही आपल्या जाळ्यात ओढल्याची प्रकरणे गेल्या काही महिन्यांत उजेडात आली आहेत.राजस्थानमध्ये १९ वर्षे वयाच्या युवकालाही असेच फेसबुकवरून मोहित करण्यात आले होते व त्याच्याकडून हवी ती माहिती आयएसआयने मिळवली होती.>कामासाठी मिळते मानधनप्रसारमाध्यमांतील एखाद्या महत्त्वाच्या संस्थेत संरक्षणविषयक पत्रकार असल्याचे भासवून फेसबुकवरील एखाद्या अकाऊंटवरून आयएसआय भारतातील बेरोजगार तरुणांशी संपर्क साधते. लष्कराविषयी विशिष्ट माहिती जमा करून देण्याविषयी त्यांना सांगितले जाते.असेच काम करीत राहिल्यास महिन्याला प्रत्येकी ४ हजार रुपये मानधन देऊ, असेही या तरुणांना आमिष दाखविले जाते. उत्पन्नाचे कसलेच साधन नसलेले तरुण या लहान रकमेसाठी काहीही करायला तयार होतात, असे दिसून आले आहे.

टॅग्स :Facebookफेसबुक