Congress: काेराेनाचा भारतीय म्हणून सामना करणे खरा राजधर्म -सोनिया गांधी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2021 04:49 AM2021-04-18T04:49:20+5:302021-04-18T04:49:53+5:30
काॅंग्रेस कार्य समितीची साेनिया गांधी यांच्या अध्यक्षदेखाली ऑनलाईन बैठक झाली. त्यावेळी त्यांनी सांगितले, की काेराेना महामारीशी लढा हे एक राष्ट्रीय आव्हान असून ते राजकारणापासून दूर ठेवायला हवे, अशी भूमिका काॅंग्रेसने कायम घेतली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : काेराेना महामारीच्या दुसऱ्या लाटेचा सामना करण्यात केंद्र सरकार सपशेल अपयशी ठरल्याची टीका काॅंग्रेसच्या अध्यक्ष साेनिया गांधी यांनी केली आहे. काेराेना महामारीला वर्ष झाल्यानंतरही सरकार गाफील राहिल्याचे खडे बाेल सुनावतानाच साेनिया गांधी यांनी लसीकरणाची वयाेमर्यादा २५ वर्षांपर्यंत घटविण्याची मागणीही केली आहे.
काॅंग्रेस कार्य समितीची साेनिया गांधी यांच्या अध्यक्षदेखाली ऑनलाईन बैठक झाली. त्यावेळी त्यांनी सांगितले, की काेराेना महामारीशी लढा हे एक राष्ट्रीय आव्हान असून ते राजकारणापासून दूर ठेवायला हवे, अशी भूमिका काॅंग्रेसने कायम घेतली आहे. मात्र, काॅंग्रेसशासित राज्यांच्या मागण्यांकडे केंद्र सरकारने कायम दुर्लक्ष केले आहे. या आव्हानाचा राजकारणापलीकडे जाऊन राजकीय प्रतिस्पर्धीऐवजी एक भारतीय म्हणून सामना करणे हाच खरा राजधर्म असेल, असे साेनिया गांधी म्हणाल्या. आपल्या देशात हजाराेंचा काेराेनामुळे दरराेज मृत्यू हाेत असून इतर देशांना लस देण्याचे औदार्य दाखविण्याचा देशाला कसा फायदा हाेणार असल्याचा सवाल साेनिया गांधींनी केला.
राहुल गांधींचे टीकास्त्र
n काॅंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीही या बैठकीत माेदी सरकारवर टीकस्त्र साेडले. काेराेनाशी लढा देण्यासाठी सरकारकडे काेणतीही रणनीती नाही.
n ना लसीकरणाची ना ऑक्सिजन पुरवठ्याची, असे गांधी म्हणाले. तर दिग्विजय सिंह आणि प्रमाेद तिवारी यांनी राहुल गांधींच्या भूमिकेचे समर्थन करतानाच फेब्रुवारीपासून व्यक्त केलेले सर्व अंदाज खरे ठरल्याचे काॅंग्रेसच्या बैठकीत सांगितले.