नवी दिल्ली - देश सध्या कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी सज्ज झाला आहे. देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत असून रुग्णांच्या संख्येने तब्बल एक कोटींचा टप्पा पार केला आहे. तर अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाच्या संकटात सोशल मीडियावर अनेक अफवा पसरवणारे मेसेज हे व्हायरल होत आहेत. असाच एक मेसेज सध्या जोरदार व्हायरल होत असून ज्यामध्ये भारतीयरेल्वेने (Indian Railway) 31 मार्चपर्यंत सर्व ट्रेन्स रद्द (All trains cancelled till 31st march) केल्या आहेत असं म्हटलं आहे. या मेसेजमुळे लोकांमध्ये भीतीचे आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सोशल मीडियावर 31 मार्चपर्यंत सर्व रेल्वे रद्द केल्याच्या मेसेज हा तुफान व्हायरल होत आहे. यासोबतच ब्रेकिंग स्वरुपातील बातमीचा एक व्हिडीओ देखील आत्ताचा असल्याचा दावा करून मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. मात्र आता प्रेस इन्फॉर्मेशन ब्यूरो म्हणजेत PIB ने हे वृत्त फेटाळून लावले असून हे खोटं असल्याचं म्हटलं आहे. 31 मार्च रोजी ट्रेन बंद होणार असल्याच्या बातमीचा व्हिडीओ हो यंदाचा नसून गेल्या वर्षीचा असल्याचं म्हटलं आहे. पीआयबीने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट करून नागरिकांना अत्यंत महत्त्वाची माहिती दिली आहे.
पीआयबीने आपल्या ट्विटमध्ये "एका बातमीत दावा करण्यात येत आहे की 31 मार्चपर्यंत सर्व ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. मात्र, ही बातमी जुनी आहे. भारतीय रेल्वे विभागाने 31 मार्च 2021 पर्यंतच्या ट्रेन रद्द करण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नाही. जुनीच बातमी वेगळ्या संदर्भाने शेअर केली जात आहे" असं म्हटलं आहे. तसेच कोरोनाच्या काळात अफवा पसरवणारे आणि दिशाभूल करणारे मेसेज इतरांना फॉरवर्ड करू नका असं आवाहन सातत्याने प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
प्रवाशांसाठी खूशखबर! रेल्वे संबंधित कुठलीही तक्रार असल्यास 'या' नंबरवर करा फोन; लगेचच सोडवणार समस्या
दररोज हजारो लोक हे रेल्वेने प्रवास करत असतात. मात्र अनेकदा प्रवास करताना काही अडचणींचा सामना करावा लागतो. मात्र आता रेल्वे प्रवाशांना चिंता करण्याची गरज नाही. कारण त्यांच्या समस्या लवकरच सोडवण्यात येणार आहेत. रेल्वेने आपल्या प्रवाशांच्या सुविधेसाठी रेल्वे हेल्पलाईन क्रमांक एकत्र केले आहेत. भारतीय रेल्वेने उपलब्ध सर्व हेल्पलाईन क्रमांकांऐवजी आता 139 क्रमांक जारी केला आहे. यामुळे प्रवाशांना हा क्रमांक लक्षात ठेवणं आणि रेल्वेशी संपर्क करणं अधिक सोपं होणार आहे. 139 या हेल्पलाईन क्रमांकावर आता प्रवाशांना सर्व माहिती आणि तक्रारही करता येणार आहे. विभागीय रेल्वे मंडळंही 139 क्रमांकाशिवाय दुसरा कुठला हेल्पलाइन क्रमांक आता जारी करणार नाहीत. 139 हा हेल्पलाईन क्रमांक वेगवेगळ्या भाषांमध्ये उपलब्ध करून दिला जाईल आणि आयव्हीआरएस ( इंटरअॅक्टिव्ह व्हॉइस रिस्पॉन्स सिस्टम ) आधारित आहे. मोबाईल वापरणाऱ्या सर्वांना 139 क्रमांकावर फोन करता येईल.
रेल्वेने लांबपल्ल्याचा प्रवास करताना प्रवाशांना कंटाळा येतो. मात्र आता धावत्या रेल्वेतून प्रवास करताना तो प्रवास प्रवाशांना कंटाळवाणा वाटणार नाही. कारण रेल्वे प्रवाशांना आता मनोरंजनासाठी एक खास नवी सुविधा मिळणार आहे. रेल्वे पीएसयू रेलटेल (RailTel) च्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार रेल्वेमध्ये बहुप्रतिक्षित अशा कंन्टेंट ऑन डिमांड (CoD) सेवा या महिनापासूनच सुरू केली जाणार आहे. नव्या सुविधेचा प्रवाशांना खूप फायदा होणार आहे. नव्या सुविधेनुसार, प्रवाशांना रेल्वेत प्रीलोडेड मल्टीलिंगुअल कंटेट उपल्बध करुन दिला जाईल. ज्यामध्ये चित्रपट, बातम्या, म्युझिक व्हिडीओ आणि जनरल एन्टरटेन्मेंटचा सहभाग असणार आहे. रेलटेलचे सीएमडी पुनीत चावला यांनी दिलेल्य़ा माहितीनुसार, बफर फ्री सेवा निश्चित करण्यासाठी मीडिया सर्व्हर रेल्वेच्या डब्यात ठेवलं जाईल. प्रवासी धावत्या रेल्वेतही आपल्या डिव्हाईसमध्ये हाय क्वालिटी असणारे बफर फ्री स्ट्रिमिंगचा आनंद घेऊ शकणार आहेत आणि वेळोवेळी यातील कंटेन्ट अपडेट होत राहील.