व्हायरल सत्य! खरंच वायनाडमध्ये राहुल गांधींच्या समर्थनार्थ फडकावले होते पाकिस्तानी झेंडे?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2019 09:54 PM2019-04-03T21:54:39+5:302019-04-03T22:13:59+5:30

केरळमधल्या वायनाडमधून राहुल गांधींनी लोकसभेची जागेवर निवडणूक लढवण्याच्या निर्णयावर सोशल मीडियावर अनेकांनी टीका केली आहे.

fact check viral test social media wayanad congress rahul gandhi pakistan flag | व्हायरल सत्य! खरंच वायनाडमध्ये राहुल गांधींच्या समर्थनार्थ फडकावले होते पाकिस्तानी झेंडे?

व्हायरल सत्य! खरंच वायनाडमध्ये राहुल गांधींच्या समर्थनार्थ फडकावले होते पाकिस्तानी झेंडे?

Next

वायनाडः केरळमधल्या वायनाडमधूनराहुल गांधींनी लोकसभेच्या जागेवरून निवडणूक लढवण्याच्या निर्णयावर सोशल मीडियावर अनेकांनी टीका केली. अनेक युजर्सनी फेसबुक आणि ट्विटवर व्हिडीओ पोस्ट केले, ज्यात काही कार्यकर्ते हिरवे झेंडे घेऊन घोषणाबाजी करताना दिसले. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओंमधील हिरवे झेंडे हे पाकिस्तानी असल्याचीही चर्चा आहे, तसेच ते राहुल गांधींच्या समर्थनार्थ फडकावण्यात आल्याचीही आवई उठवली गेली. परंतु या सर्व गोष्टींची पडताळणी केली असता, हे सर्व खोटं असल्याचं समोर आलं आहे. 

इंडियन युनियन मुस्लिम लीग(IUML) हा केरळमधला काँग्रेसचा मित्र पक्ष आहे. 26 मार्चला फेसबुकवर 'चौकीदार बी के मिश्रा' या नावाच्या युजर्सनं एक व्हिडीओ पोस्ट केला, 25 सेकंदांच्या या व्हिडीओला ‘न्यूज 18 मलयालम’चा लोगो लावण्यात आला होता. या व्हिडीओमध्ये राहुल गांधींच्या समर्थनार्थ काही लोक घोषणाबाजी करत असल्याचंही समोर दिसत होतं. या व्हिडीओमध्ये काही लोकांकडून फडकावण्यात आलेल्या झेंड्यांमध्ये पांढरे स्टार आणि एक अर्धा चंद्र दिसत होता. या व्हिडीओबरोबर लिहिलं होतं की, राहुल गांधींचा वायनाड (केरळ)मध्ये पाकिस्तानी झेंड्यांसह प्रचार.


आतापर्यंत या पोस्टला 1700 लोकांनी शेअर केलं. विशेष म्हणजे हा व्हिडीओ ट्विटरवरही उपस्थित आहे. युजर्स चौकीदार प्रेरणानं व्हिडीओबरोबर लिहिलं आहे की, राहुल गांधी वायनाडमधून निवडणूक लढत आहेत, बघा कोण तिथे पाकिस्तानी झेंडे फडकावून आनंद साजरा करत आहेत. आताच समजलं राहुल गांधींनी हा मतदारसंघ का निवडला. अशाच प्रकारचा एक दुसराही व्हिडीओ व्हायरल झाला. त्या व्हिडीओमध्येही पाकिस्तानचे झेंडे फडकत असून, मागे राहुल गांधींचा मोठा फोटोही दिसतोय.
एका वृत्तसंस्थेनं यासंदर्भात 31 मार्चला बातमीही दिली होती. वायनाडमधून राहुल गांधींच्या उमेदवारीमुळे यूडीएफमध्ये जबरदस्त उत्साह, असंही लिहिलं होतं. इंडियन यूनियन मुस्लिम लीग (IUML) यांचा झेंडाही पाकिस्तानच्या झेंड्यासारखाच आहेत, परंतु या दोन्ही झेंड्यांमध्ये मोठा फरक आहे. इंडियन यूनियन मुस्लिम लीग आणि काँग्रेसची आघाडी असल्यानं त्यांनी राहुल यांना उमेदवारी मिळाल्यानंतर प्रचारादरम्यान पक्षाचे झेंडे फडकावल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे राहुल गांधींच्या समर्थनार्थ प्रचार रॅलीमध्ये कुठेही पाकिस्तान झेंडे फडकावण्यात आलेले  नाहीत. तर ते झेंडे यूनियन मुस्लिम लीग (IUML) या पक्षाचे होते.

Web Title: fact check viral test social media wayanad congress rahul gandhi pakistan flag

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.