अहमदाबाद - पुलवामा येथे झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 40 जवान शहीद झाले आहेत. गुरुवारी (14 फेब्रुवारी) जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला झाला. अवंतीपुरा दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली असून शहीद वीर जवानांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. गुजरातमध्ये एका टाइल्स निर्मिती करणाऱ्या व्यापाऱ्याने पाकिस्तान मुर्दाबाद असं लिहिलेल्या टॉयलेट टाइल्स बनवून पुलवामा हल्ल्यासाठी दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या पाकिस्तानचा निषेध केला आहे.
पाकिस्तानचा झेंडा असलेल्या तसेच ‘पाकिस्तान मुर्दाबाद’ असं लिहिलेल्या टाइल्स सार्वजनिक शौचालय बांधण्यासाठी वापरल्या जाणार आहेत. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने याबाबतचे वृत्त दिले आहे. पाकिस्तानचा निषेध करण्याच्या उद्देशाने आम्ही या टाइल्स बनवल्याची माहिती टाइल्स कारखान्याचे मालक सुरेश कौसुंदरा यांनी दिली. 'मागणी वाढेल त्याप्रमाणे आम्ही यांचे उत्पादन वाढवणार आहोत. मोरबी येथील सर्वाजनिक शौचालय बांधण्यासाठी या वापरल्या जातील. पण जर या टाइल्सना दुसऱ्या ठिकाणांहून मागणी आली तर आम्ही त्या मोफतही देण्यास तयार आहोत' असं सुरेश कौसुंदरा यांनी सांगितलं आहे.
काश्मीरमधील तरुणांना लष्करात जायचंय; 111 जागांसाठी तब्बल 2500 अर्जपुलवामा हल्ल्यानंतर हजारो तरुण लष्करात जाण्यास उत्सुक आहेत. बारामुल्ला येथे भारतीय लष्कराने 111 जागांसाठी भरती सुरू केली आहे. 111 जागांसाठी तब्बल 2500 तरुणांनी अर्ज करत लष्करात भरती होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. लष्करातील भरतीला काश्मिरी तरुणांनी चांगलाच प्रतिसाद दिल्याचं पाहायला मिळत आहे. 'लष्करात भरती होऊन देशसेवा करण्याची संधी आम्हाला मिळत आहे. आम्हाला नोकरीची फार कमी संधी आहे. लष्करात भरती होऊन आम्ही आमच्या कुटुंबाची सुरक्षा करू शकतो सोबत काळजीदेखील घेऊ शकतो' असं भरतीसाठी आलेल्या बिलाल अहमद या तरुणाने म्हटले आहे. तर 'आम्ही काश्मीरच्या बाहेर जाऊ शकत नाही. आमच्यासाठी ही खूप मोठी संधी आहे. काश्मीरमधील जवानांना संवेदनशील परिसरांमध्ये तैनात केलं तर ते स्थानिकांशी चर्चा करत जास्त चांगल्या पद्धतीने परिस्थिती हाताळू शकतात' असं ही एका तरुणाने सांगितलं आहे.
Pulwama Attack : कॉन्स्टेबलचा अनोखा आदर्श, शहिदांच्या मदतीसाठी तो करतोय पैसे जमा
पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार अब्दुल रशीद गाझीचा खात्मा केल्यानंतर भारतीय लष्कराने दहशतवाद्यांना आणि त्यांना पोसणाऱ्यांना कठोर इशारा दिला आहे. दहशतवाद्यांनी एकतर हत्यारं सोडून समर्पण करावं किंवा मग मरणास सामोरं जाण्यास तयार राहावे, असा स्पष्ट इशाराच भारतीय लष्कराने पत्रकार परिषदेत दिला आहे. ''दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदवर पाकिस्तानी सैन्य आणि ISIचा वरदहस्त आहे. जैश-ए-मोहम्मद पाकिस्तानी सैन्याचंच अपत्य आहे'',असा थेट निशाणाच भारतीय लष्कराने पाकिस्तानवर केला आहे. तसंच आगामी काळातही दहशतवाद्यांविरोधातील मोहीम तीव्र स्वरुपात राबवली जाईल आणि काश्मीर खोऱ्यात घुसखोरी करणाऱ्या प्रत्येक दहशतवाद्याचा खात्मा केला जाईल. त्यांना जिवंत सोडलं जाणार नाही', असेही भारतीय लष्कराने ठणकावून सांगितले आहे.