ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 15 - गेली सहा दशके समुद्रात अधिराज्य गाजवणा-या आयएनएस विराटला 2016मध्ये निरोप देण्यात आला. भारतीय नौदलाचे प्रमुख अॅडमिरल सुनील लांबा यांनी निवृत्त झालेल्या विमानवाहू आयएनएस विराटला चार महिन्यांच्या आत भंगारात विकण्यात येईल, अशी घोषणा केली होती. त्यानंतर आता महाराष्ट्र सरकार विराटचं जतन करण्यासाठी पुढे सरसावलं आहे. महाराष्ट्र सरकारकडे विराटला जतन करण्यासाठी अनोखी योजना आहे, अशी माहिती एनडीटीव्हीच्या सूत्रांकडून मिळाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा या विमानवाहू युद्धनौकेचा ताबा मिळवून पाण्याच्या आत मेमोरिअल बनवण्याचा मानस आहे. मुंबईपासून दक्षिणेकडच्या 500 किलोमीटर लांबच्या सिंधुदुर्गातील एका किना-यावर समुद्राच्या आतमध्ये हे मेमोरिअल विकसित करण्याचा प्रस्ताव आहे. प्रस्तावित मेमोरिअलला एक कृत्रिम रीफ सारखा तयार करण्यात येणार असून, त्यात तुम्हाला स्कूबा डायव्हिंग करता येईल, अशी व्यवस्था ठेवण्यात येणार आहे. कोकणात सिंधुदुर्गासह रत्नागिरीतही पर्यटनाला चालना देण्यासाठी हे मेमोरिअल करण्याचा पर्यटन विभागाचा प्रस्ताव आहे. सहा दशके सेवेत घालवल्यानंतर निवृत्त झाल्यावर नौदलाचे प्रमुख अॅडमिरल सुनील लांबा यांनी कोणत्याही सरकारनं विराटचा ताबा घेऊ नये, अशी इच्छा बोलून दाखवली होती. तसेच विराटला इतर विमानवाहू नौकांसारखं समुद्रात जतन करण्यात आलं पाहिजे. जेणेकरून त्याचं संग्रहालय करता येईल, असं म्हटलं होतं. त्यानुसारच महाराष्ट्र सरकारनं विराटला विजयदुर्गजवळ 24 किलोमीटर पश्चिमेकडे अरबी समुद्रात बुडवण्यात येईल, जेथे पाणी पूर्णतः स्वच्छ असेल. या मेमोरिअलमुळे 500 तरुणांना रोजगार उपलब्ध होणार असून, 4000 लोकांना अप्रत्यक्षपणे उत्पन्न मिळणार आहे.
फडणवीस बनणार सुपरहिरो, विराटच्या मेमोरिअलचा प्रस्ताव
By admin | Published: March 15, 2017 8:58 PM