- नितीन अग्रवाल नवी दिल्ली : मराठा आरक्षणासंदर्भात सोमवारी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली. जवळपास तासभर चाललेल्या या भेटीत फडणवीस यांनी राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली. मराठा आंदोलनात ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत ते मागे घेण्यासाठी सगळ्या जिल्हा पोलीस अधीक्षकांना पत्र पाठवण्यात आले आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी भेटीत सांगितले.भाजपचे प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या घरी राज्यातील भाजपच्या लोकसभा आणि राज्यसभा सदस्यांची बैठक झाली. बैठकीत राज्यात संघटनेला बळकट करण्यावर चर्चा झाली. रात्री उशिरापर्यंत चाललेल्या या बैठकीला फडणवीस यांच्यासह केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, प्रकाश जावडेकर, सुरेश प्रभु, सुभाष भांबरे, हंसराज अहिर, भाजपकडून संघटन मंत्री रामलाल, महाराष्ट्राच्या प्रभारी महासचिव सरोज पांडेय, भुपेंद्र यादवदेखील उपस्थित होते. यांच्याशिवाय महाराष्ट्राचे जलसंधारणमंत्री राम शिंदे, किरीट सोमय्या, गोपाळ शेट्टी, विनय सहस्त्रबुद्धे, ए. टी. नाना पाटील, नारायण राणे, रक्षा खडसे, दिलीप गांधी, प्रीतम मुंडे, अशोक नेते, रामदास तडस, हरिश्चंद्र चव्हाण, राजेंद्र गावित, शरद बनसोडे, संजय धोत्रे, सुनिल गायकवाड व हीना गावित आदी उपस्थित होते.
मराठा आरक्षणासंदर्भात फडणवीसांची मोदींशी चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2018 6:32 AM