शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

Alert! 'या' ५ फाइल्स चुकूनही डाऊनलोड करू नका; बनावट Cowin अ‍ॅपबाबत सरकारचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2021 6:00 PM

Covid Vaccine Registration : CERT-In नं सर्वांना रजिस्ट्रेशनच्या नावावर या फाईल्स डाऊनलोड न करण्याचा इशारा दिला आहे. यामुळे डेटा सुरक्षिततेला धोका निर्माण होण्याची शक्यता केली व्यक्त.

ठळक मुद्दे CERT-In नं सर्वांना रजिस्ट्रेशनच्या नावावर या फाईल्स डाऊनलोड न करण्याचा इशारा दिला आहे.यामुळे डेटा सुरक्षिततेला धोका निर्माण होण्याची शक्यता केली व्यक्त.

Fake Covid Vaccine Registration: सध्या देशात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या पार्श्वभूमीवर देशात व्यापक प्रमाणात लसीकरणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. तर दुसरीकडे १ मे पासून देशात १८ वर्षांवरील सर्वांच्या लसीकरणाची परवानगी देण्यात आली आहे. असं असलं तरी अनेक ठिकाणी लसींच्या असलेल्या टंचाईमुळे लोकांना लस मिळत नाही. अनेकदा लसींच्या मर्यादित संख्येमुळे लोकांना स्लॉटही मिळत नाहीत. या परिस्थितीचा फायदा घेऊन काही अॅप लोकांची माहिती घेत असल्याचं समोर आलं आहे. इंडियन कंम्प्युटर इमरजन्सी रिस्पॉन्स टीमच्या (CERT-In) सदस्यांनी अशा बनावट अॅप्सबाबत इशारा दिला आहे. तसंच हे अॅप्स एसएमद्वारे पसरवण्यात येत असून याच्या सहाय्यानं वैयक्तिक माहिती चोरली जाऊ शकते असंही त्यांनी म्हटलं आहे.

CERT-In नं दिलेल्या माहितीनुसार एसएमएसद्वारे या बनावट अॅप्सवरून लसीकरणासाठी रजिस्ट्रेशनची ऑफर दिली जात आहे. प्रत्येक मेसेजचा कंटेन्ट निरनिराळा असू शकतो. तसंच अँड्रॉईड युझरला ते एपीके फाईल्सद्वारे डाऊनलोड करण्यास सांगू शकतो. एसएमएससोबत एक डाऊनलोड लिंकही पाठवली जाते. यामध्ये Covid-19.apk, Vccin-Apply.apk, Cov-Regis.apk, Vaci__Regis.apk, आणि MyVaccin_v2.apk चा समावेश आहे. 

इन्स्टॉल केल्यास मित्रांनाही मेसेजज्या लोकांनी हे एपीके डाऊनलोड केले आहेत त्यांच्या मित्रांनाही एसएमएस जात असल्याचं CERT-In नं म्हटलं आहे. नियमाकानं युझर्सना या अॅपच्या अप्रुव्हल न देण्याच्या सूचना केल्या आहेत. तसंच हे अॅप युझरच्या पासवर्डसहित व्यक्तिगत माहितीही चोरली जाऊ शकते. CERT-In नं अशा बनावट डोमेन, ईमेल्स आणि मेसेजेस आणि फोन कॉलपासून सावध राहण्यास सांगितलं आहे. रजिस्ट्रेशनसाठी केवळ cowin.gov.in ही अधिकृत वेबसाईट असल्याचंही सांगण्यात आलं आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसIndiaभारतGovernmentसरकार