शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
2
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
3
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
4
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
5
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
6
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
7
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
8
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
9
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
10
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
11
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
12
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
13
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
14
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
15
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

धुळ्याच्या पथकाकडून बनावट औषधी जप्त फसवणूक : ढाकेवाडीत कारवाई; एकास अटक

By admin | Published: June 20, 2016 12:22 AM

जळगाव: प्रिया फार्मासिटीकल्स या नावाने बनावट आयुर्वेदीक औषध तयार करुन त्याची विक्री करुन फसवणूक करणार्‍या जयंत अनंत शिंदे (वय ५२ रा.ढाकेवाडी) याला औद्योगिक वसाहत पोलिसांनी अटक केली आहे. धुळे येथील अन्न व औषध प्रशासनाने त्याच्या ढाकेवाडीतील घरी धाड टाकून चार हजार ३५० रुपयांचे बनावट औषध जप्त केले आहे. त्याच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव: प्रिया फार्मासिटीकल्स या नावाने बनावट आयुर्वेदीक औषध तयार करुन त्याची विक्री करुन फसवणूक करणार्‍या जयंत अनंत शिंदे (वय ५२ रा.ढाकेवाडी) याला औद्योगिक वसाहत पोलिसांनी अटक केली आहे. धुळे येथील अन्न व औषध प्रशासनाने त्याच्या ढाकेवाडीतील घरी धाड टाकून चार हजार ३५० रुपयांचे बनावट औषध जप्त केले आहे. त्याच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ढाकेवाडीतील जयंत शिंदे हे मेसर्स मंदार आयुर्वेदीक प्रॉडक्ट नावाचे बनावट औषध गुजरातमधील कबीलपूर (जि.नवसारी) यांच्या प्रिया फार्मासिटीकल्स या नावाने विक्री करीत असल्याची तक्रार कंपनीने धुळे येथील अन्न व औषध प्रशासनाकडे केली होती. औषध निरीक्षक श्याम साळे यांनी औद्योगिक वसाहत पोलिसांची मदत घेवून शनिवारी रात्री ढाकेवाडीत शिंदे याच्या घरावर धाड टाकली. यावेळी प्लास्टीकच्या पांढर्‍या रंगाच्या डबीत चार हजार ३५० रुपये किमतीची बनावट आयुर्वेदीक औषध मिळून आली. त्याच्या घरातून ती जप्त करण्यात आली. घटनास्थळाचा पंचनामा करुन शिंदे यांच्याविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. औषध निरीक्षक श्याम साळे यांनी फिर्याद दिली आहे.