खोटे बोलणाऱ्या सीतारामन यांनी राजीनामा द्यायला हवा- राहुल गांधी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2018 04:32 AM2018-09-21T04:32:41+5:302018-09-21T04:32:55+5:30
राफेल विमानांच्या निर्मितीसंदर्भात हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) या कंपनीच्या क्षमतेबाबत खोटी विधाने करणाºया संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी केली.
नवी दिल्ली : राफेल विमानांच्या निर्मितीसंदर्भात हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) या कंपनीच्या क्षमतेबाबत खोटी विधाने करणाºया संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी केली. या प्रकरणात त्या दुसºयांदा खोटे बोलल्या आहेत, असाही आरोप त्यांनी केला. त्यास प्रत्युत्तर देताना केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी राहुल गांधी हे ‘हास्यास्पद युवराज’ असल्याची टीका केली.
‘राफेलमंत्री’ असा सीतारामन यांचा उल्लेख करून राहुल गांधी यांनी टष्ट्वीटमध्ये म्हटले आहे की, राफेल खरेदी व्यवहारातील घोटाळ्याचे समर्थन करण्याची कामगिरी त्यांच्याकडे आहे. राफेलची निर्मिती करण्याची हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) या सरकारी कंपनीकडे क्षमता नाही या त्यांच्या विधानातील खोटारडेपणा एचएएलचे माजी संचालक टी. सुवर्णा राजू यांनी दाखवून दिला आहे. एचएएलकडे राफेलचे उत्पादन करण्याची क्षमता नसल्याचा दावा राजू यांनी खोडून काढल्यानंतर राहुल गांधी यांनी सीतारामन यांचा राजीनामा मागितला आहे. मोदी सरकारने राफेल प्रकरणी केलेल्या करारामुळे देशाचे ४१ हजार कोटींचे नुकसान झाले. मित्र उद्योजकावर मेहेरनजर करण्यासाठी सरकारने या करारातून एचएएलला बाहेरचा रस्ता दाखविला, असा आरोप काँग्रेस पक्षाने केला आहे.