शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
2
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
3
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
4
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
5
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
6
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
7
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
8
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
9
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
10
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
11
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
12
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
13
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
14
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
15
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
20
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...

आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांची कुटुंबे वार्‍यावर! मानवाधिकार आयोगाकडून गंभीर दखल : महाराष्ट्र सरकारला नोटीस

By admin | Published: February 18, 2015 11:53 PM

नितीन अग्रवाल / नवी दिल्ली

नितीन अग्रवाल / नवी दिल्ली
सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे मृत्यूला कवटाळणार्‍या महाराष्ट्रातील २ हजार ७३१ शेतकर्‍यांच्या आश्रितांना राज्य सरकारकडून अद्यापही कुठलीही आर्थिक मदत मिळाली नसल्याचे समोर आल्यानंतर राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने याची गंभीर दखल घेतली आहे़ आयोगाने यासंदर्भात महाराष्ट्र सरकारला नोटीस जारी केली असून, दोन आठवड्यांत याचे उत्तर देण्याचे बजावले आहे़
प्रसिद्धीमाध्यमांनी दिलेल्या बातम्यांच्या आधारावर आयोगाने ही नोटीस बजावली आहे़ गत चार वर्षांत आत्महत्या करणार्‍या २,७३१ शेतकर्‍यांच्या कुटुंबियांना शासकीय नियमांतर्गत एक लाख रुपयांपर्यंतची लहानशी मदतही दिली गेलेली नाही़ यावर आयोगाने आपल्या नोटीसमध्ये प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे़ राज्य सरकारकडून याआधीही अशाच प्रकारच्या पाच अन्य प्रकरणांबाबत माहिती मागण्यात आली होती़ मात्र, राज्य सरकारने ही माहिती अद्याप दिलेली नाही, याकडेही आयोगाने लक्ष वेधले आहे आहे़
संबंधित नोटीसमध्ये आयोगाने एका सामाजिक कार्यकर्त्याने माहिती अधिकार कायद्यांतर्गत राज्य सरकारकडून मागितलेल्या आकडेवारीचा हवाला दिला आहे़ त्यानुसार, सन २०११ मध्ये महाराष्ट्राच्या ग्रामीण भागांतील ५,६९८ शेतकर्‍यांनी आत्महत्या केली आहे़ यापैकी २,७३१ शेतकर्‍यांच्या विधवांना अद्यापही कुठलीही मदत दिली गेलेली नाही़ आत्महत्या करणार्‍या या शेतकर्‍यांनी पिकासाठी बँकेचे कुठल्याही प्रकारचे कर्ज घेतलेले नव्हते किंवा त्यांच्याकडे जमीन नव्हती, या सबबीवर त्यांना सरकारी मदत नाकारण्यात आली आहे़ या पार्श्वभूमीवर आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या आश्रितांना नुकसानभरपाई देण्याच्या विद्यमान नियमांची तात्काळ समीक्षा करण्याची गरज संबंधित सामाजिक कार्यकर्त्याने व्यक्त केली आहे़