हाथरस/लखनऊ: कडेकोड पोलीस बंदोबस्तात हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडितेचं कुटुंब लखनऊला रवाना झालं आहे. आज या प्रकरणी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे. त्यासाठी सकाळी पीडितेचे कुटुंबीय पोलीस बंदोबस्तात लखनऊसाठी निघाले.पीएफआय-भीम आर्मीमध्ये कोणतेही संबंध नाहीत; ईडीचा तपासातून निष्कर्षआपण स्वत: पीडित कुटुंबासोबत जात असल्याची माहिती एसडीएम अंजली गंगवार यांनी दिली. 'कुटुंबाच्या सुरक्षेची पूर्ण काळजी घेण्यात आली आहे. त्यासाठी विशेष तयारी करण्यात आली आहे. डीएम आणि एसपीदेखील सोबत आहेत,' अशी माहिती गंगवार यांनी दिली. मिळालेल्या माहितीनुसार आज न्यायालयात पीडितेचे वडील, आई, भावासह पाच जण जबाब नोंदवतील."बडगा उगारल्याशिवाय शासन, प्रशासन जागं होत नाही, सर्वोच्च न्यायालयावर ही वेळ का यावी?"रात्री निघण्यास कुटुंबानं केला विरोधकुटुंबाला रविवारीच लखनऊला नेण्याची योजना पोलिसांनी आखली होती. मात्र आपल्या जिवाला धोका असल्याचं म्हणत कुटुंबानं निघण्यास नकार दिला. उच्च न्यायालयानं स्वत: हाथरस प्रकरणाची दखल घेतली आहे. न्यायालयानं गृह सचिव, डीजीपी, एसपी आणि हाथरसच्या डीएमना समन्स बजावलं आहे.हाथरस प्रकरणाचा तपास सीबीआयकडे; आरोपीवर गुन्हा दाखल२९ सप्टेंबरला पीडितेचा मृत्यू१४ सप्टेंबरला उत्तर प्रदेशच्या हाथरस जिल्ह्यातल्या चंदपा भागात एका १९ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार झाला. या तरुणीवर आधी अलिगढच्या जवाहरलाल नेहरू मेडिकल महाविद्यालय रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यानंतर तिला दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथे २९ सप्टेंबरला तिची मृत्यूशी सुरू असलेली झुंज संपुष्टात आली. त्यानंतर रात्री उशिरा तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मुलीचं शेवटचं दर्शनही घेऊ दिलं गेलं नसल्याचा आरोप पीडितेच्या कुटुंबीयांनी केला. या घटनेनंतर देशभरातून संताप व्यक्त करण्यात आला. काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी वाड्रा आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी पीडितेच्या कुटुंबाला भेटण्यासाठी हाथरसला गेले होते.