पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदरसंदर्भात रोज नव-नवे खुलासे समोर येत आहेत. सध्या उत्तर प्रदेश ATS कडून गेल्या दोन दिवसांपासून तिची कसून चौकशी सुरू आहे. यातच आता, तिचा पाकिस्तनी पती असलेल्या गुलामने मोठा खुलासा केला आहे. सीमाचा भाऊ आणि काका दोघेही पाकिस्तानी सैन्यात असल्याचे गुलामने म्हटले आहे.
सीमाचा भाऊ आसिफ सैन्यात शिपाई असून तो कराचीत तैनात आहे. तर काका गुलाम अकबर हे पाकिस्तानी सेन्यात अधिकारी असून ते इस्लामाबादमध्ये पोस्टेड असल्याचे त्याने सांगितले आहे. आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, सीमाचा पती गुलाम हैदरने सांगितले की, तो आसिफला भेटला आहे आणि त्यांच्यात बोलणेही होत असते. याशिवाय, सीमाला तिच्या घरातील लोक अजिबात आवडत नव्हते. तिच्या कुटुंबीयांचा आमच्या लग्नाला विरोध होता. यामुळे ती घरातून पळून माझ्याकडे आली होती आणि आम्ही कोर्ट मॅरेज केले.
गुलाम हैदर म्हणाला, ''सीमा आपल्या घरातील कुटुंबीयांसंदर्भात नेहमीच वाईट बोलायची. तिचे आई-वडील लालची असल्याचेही ती म्हणत होती. त्यांनी तिचे लग्न एका लोफर मुलासोबत ठरवले होते. यामुळे ती माझ्याकडे पळून आली होती.'' यासंदर्भात सीमाने अॅफिडेविटमध्येही भाष्य केले होते. यात, "आपण आई-वडिलांना कंटाळून घर सोडले आणि गुलामकडे आलो, गुलामवर माझा पूर्ण विश्वास आहे. मी त्याच्यासोबत लग्न करत आहे. मुला विश्वास आहे की तो मला आनंदात ठेवेल, असे तिने म्हटले होते."
महत्वाचे म्हणजे, सीमा आणि तिच्या मुलांना परत पाठविण्यासंदर्भात गुलाम भारत सरकारकडे व्हिडीओच्या माोध्यमाने विनंती करत आहे. मात्र, आपण पाकिस्तानात परत जाणार नाही. आपण गुलामला चार वर्षांपूर्वी सोडले होते. कारण तो मारहाण करत होता. आता आपण सचिनसोबत खूश आहोत आणि कायम त्याच्यासोबत राहायचे आहे, असे सीमाने म्हटले आहे.