वलसाड : गुजरातचे प्रसिद्ध गायक कीर्तिदान गढवी पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यावेळी गुजरातमधील वलसाडमध्ये आयोजित कार्यक्रमात त्यांच्यावर पैशांचा पाऊस पडताना दिसला. गढवी यांचे गाणे ऐकून कार्यक्रमाला आलेले लोक इतके प्रभावित झाले की त्यांनी गढवींवर 10, 20 आणि 100 रुपयांच्या नोटांचा वर्षाव केला, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
गढवी यांचा जन्म मध्य गुजरातमधील खेडा जिल्ह्यातील वलवोद येथे झाला. किर्तीदान यांनी M.S. विद्यापीठाच्या परफॉर्मिंग आर्ट्स फॅकल्टीमधून संगीतात बीपीए (BPA) आणि एमपीए (MPA) प्राप्त केले आहे. त्यानंतर ते भावनगरला गेले आणि भावनगर विद्यापीठात संगीत शिक्षक झाले.
गढवी हे वर्ल्ड टॅलेंट ऑर्गनायझेशन, USAचे ब्रँड ॲम्बेसेडरही राहिले आहेत गढवी यांना अमेरिकेत 'वर्ल्ड अमेझिंग टॅलेंट' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून ते वर्ल्ड टॅलेंट ऑर्गनायझेशन, यूएसएचे ब्रँड ॲम्बेसेडरही राहिले आहेत. 'लडकी', 'नगर में जोगी आया' आणि 'गोरी राधा ने कालो कान' ही त्यांची लोकप्रिय गाणी आहेत. सध्या ते कच्छ जिल्ह्यातील काठियावाड येथे राजकोटमध्ये राहत आहे.
कीर्तिदान गढवी यांनी 2015 मध्ये गुजरातमधील जामनगर येथील गोरक्षण रॅलीमध्ये सुरुवात केली, त्यामधून त्यांना तब्बल 45 दशलक्ष रुपये मिळाले. एप्रिल 2015 मध्ये त्यांनी MTV कोक स्टुडिओ या टीव्ही शोमध्ये सचिन-जिगर, तनिष्का आणि रेखा भारद्वाज सोबत 'लाडकी' हे गाणे गायले, ज्याने त्यांना राष्ट्रीय पातळीवर ओळख मिळवून दिली.
अनेक कार्यक्रमात गढवींवर पैशांचा पाऊस कीर्तिदान गढवी यांच्यावर पैशांचा पाऊस पडण्याची ही पहिलीच वेळ नाही, याआधीही अनेक कार्यक्रमात गढवी यांच्यावर पैसे उधळण्यात आले आहेत. पैशांचा पाऊस पडत असतानाचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"