बंगळुरू/नवी दिल्ली : कृष्ण विवरांचे (ब्लॅक होल्स) भारतीय अभ्यासक व ख्यातनाम शास्त्रज्ञ प्रोफेसर सी. व्ही. विश्वेशर (७८) यांचे सोमवारी रात्री बंगळुरूत निधन झाले. ते गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. युनिव्हरसिटी आॅफ मेरिलँडमध्ये त्यांनी १९७० मध्ये ज्यांनी कृष्ण विवरांचा अभ्यास सुरू केला त्यात विश्वेशर यांचा समावेश होता. हा अभ्यास सुरू होता त्यावेळी तर या कृष्ण विवरांना ओळखही नव्हती. त्यांनी जी गणिते मांडली त्यामुळे दोन एकमेकांत विलीन होणाऱ्या कृष्ण विवरांतून निघणाऱ्या सिग्नल्सना ग्राफीकचे रुप देता आले.‘विशू’ या नावाने ते सगळ््यांना परिचित होते. त्यांना त्यांचे वडील सी. के. वेंकट रामय्या यांच्यापासून प्रेरणा मिळाली होती. विश्वेशरा यांनी व्यंगचित्रेही काढली होती. त्यापैकी अनेक भौतिकशास्त्र परिषदेच्या पुस्तकात प्रसिद्ध झाली होती.
ख्यातनाम शास्त्रज्ञ विश्वेशरांचे निधन
By admin | Published: January 18, 2017 5:30 AM