प्रसिद्ध शायर राहत इंदौरी कोरोना पॉझिटीव्ह, चाहत्यांना केलं महत्त्वाचं आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2020 09:00 AM2020-08-11T09:00:24+5:302020-08-11T09:01:19+5:30
राहत इंदोरी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन चाहत्यांना माहिती देताना म्हटले की, मला कोरोनाची लक्षणे दिसू लागल्यामुळे टेस्ट केली. त्यामध्ये माझी कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे.
इंदौर - कोरोना व्हायरसचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार सर्वोतोरी प्रयत्न करत आहे. मात्र, देशात अनलॉकची घोषणा केल्यानंतर कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होताना दिसत आहे. बिग बी अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाली होती, तर अनेक दिग्गजांनाही या रोगाचा सामना करावा लागला आहे. आता, प्रसिद्ध हिंदी आणि उर्दू शायर व गीतकार राहत इंदौरी यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यांनी स्वत:च याबद्दल सोशल मीडियातून माहिती दिली आहे.
कोविड के शरुआती लक्षण दिखाई देने पर कल मेरा कोरोना टेस्ट किया गया, जिसकी रिपोर्ट पॉज़िटिव आयी है.ऑरबिंदो हॉस्पिटल में एडमिट हूँ
— Dr. Rahat Indori (@rahatindori) August 11, 2020
दुआ कीजिये जल्द से जल्द इस बीमारी को हरा दूँ
एक और इल्तेजा है, मुझे या घर के लोगों को फ़ोन ना करें, मेरी ख़ैरियत ट्विटर और फेसबुक पर आपको मिलती रहेगी.
राहत इंदोरी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन चाहत्यांना माहिती देताना म्हटले की, मला कोरोनाची लक्षणे दिसू लागल्यामुळे टेस्ट केली. त्यामध्ये माझी कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. त्यामुळे मी ऑरबिंदो हॉस्पीटल येथे उपचारासाठी दाखल झालो आहे. मी फेसबुक आणि ट्विटरवरुन आपणास माझ्या प्रकृतीची माहिती देतच राहिल. आपल्या प्रार्थनांची गरज आहे. कृपया, कुणीही मला किंवा कुटुंबीयांना फोन करु नये, असे आवाहनही राहत इंदौरी यांनी केले आहे.
राहत यांच्या कोरोना अहवालाची माहिती मिळताच, त्यांच्या चाहत्यांना त्यांच्यासाठी प्रार्थना करायला सुरुवात केली आहे. तर, मध्य प्रदेशचे गृहमंत्री डॉ. नरोत्तम मिश्रा यांनीही त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली आहे.
जाने-माने शायर राहत इंदौरी जी के अस्वस्थ होने की खबर मिली है।
— Dr Narottam Mishra (@drnarottammisra) August 11, 2020
ईश्वर से उनके यथाशीघ्र स्वस्थ होने की कामना करता हूँ। pic.twitter.com/vWKteVNyg8
दरम्यान, इंदौरमध्ये, आरोग्य विभागाची टीम येथील टाटपट्टी बाखलमध्ये काही महिलांची तपासणी करण्यासाठी पोहोचली असता, या टीमवर स्थानिक लोकांनी दगडफेक केल्याचे समोर आले होते. या घटनेनंतर शायर राहत इंदोरी यांनी ट्विटवरुन एक व्हिडीओ अपलोड करत नागरिकांनी आवाहन केलं होते. डॉक्टर, पोलीस हे सर्व आपले मदतगार आहेत. जर, आपण त्यांची मदत केली, तरच उद्या वेळ आपल्या मदतीला येईल, असे भावूक आवाहन डॉ. राहत इंदोरी यांनी केलं होतं. तर, कोरोनाबाबत मोठ्या प्रमाणात जागृती करण्याचं कामही ते आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन करत आहेत.