ऑनलाइन लोकमत
चेन्नई, दि. २९ - प्रसिद्ध पार्श्वगायिका पी. सुशीला मोहन यांचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाले आहे. गेल्या पाच दशकाच्या करिअरमध्ये पी. सुशीला मोहन यांनी केलेल्या कामगिरीमुळे त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यातच आता त्यांच्या नावांची भारतीय भाषांमध्ये सर्वाधिक जास्त गाणी गायिल्याने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड आणि अशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली आहे.
पी. सुशीला मोहन यांनी भारतातील १२ भाषेतून १७,६९५ गाणी गायली असल्याचे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद केले आहे, तर अशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये १७,३३० गाणी गायल्याचे नोंद करण्यात आले आहे. रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात आलेली गाणी ही १९६० पासूनची आहेत.
१९५१ पासून मी गाणी गायला सुरुवात केली. त्यावेळी मोठे यश मिऴविण्यासाठी जास्त मेहनत करावी लागत होती.मात्र सध्याच्या काळात अनेक टीव्ही चॅनेल, वर्तमानपत्रे आहेत. त्यामुळे एखादा गायक लगेच प्रसिद्धीच्या झोतात येऊ शकतो, असे पी. सुशीला मोहन यांनी सांगितले.