सोशल मीडियावर व्ह्यूज आणि लाईक्ससाठी लोक कोणत्याही थराला जायला तयार असतात. जीव पणाला लावावा लागला तरी चालेल असं काहींचं असतं. अशीच एक घटना घडली आहे. एका YouTuber चा स्टंट करताना भीषण अपघात झाला होता. टीटीएफ वासन असं त्याचं नाव आहे. त्याच्या फॅन्सची संख्या खूप मोठी आहे. तो हायस्पीड मोटारसायकल चालवण्यासाठी ओळखला जातो. ही गोष्ट आवडणारे लोक त्याला फॉलो करतात. निष्काळजीपणामुळे त्याला वाहतूक पोलिसांनी अनेकदा ताकीद दिली आहे.
टीटीएफ वासनला अनेकवेळा वाहतुकीचे नियम मोडल्याबद्दल दंडही भरावा लागला आहे. रविवारी चेन्नईहून कोईम्बतूरला जात असताना हा मोठा अपघात झाला. बलुचेट्टी चथिराम ओलांडताना सर्व्हिस लेनवर स्टंट करत असताना त्याचा अपघात झाला. तो बाईकचं चाक वरच्या दिशेने वळवत होता. या अपघाताचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वासन हा बाईक वेगाने चालवत असल्याचं दिसून येतं. त्यानंतर तो त्याच्या बाईकचं पुढचं चाक वरच्या दिशेने वळवण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर बाईक घसरते. वासन पडतो.
संरक्षण उपकरणामुळे जीव वाचला
वासनचं बाईकवरील नियंत्रण सुटलं होतं. सुदैवाने त्यांचा जीव वाचला आहे. कारण त्याने प्रोटेक्शन गियर घातला होता. त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी चेन्नईला पाठवण्यात आले. पोलिसांनी अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज मिळवले आहे. आता उपचारानंतर ते युट्युबरची चौकशी करण्याची वाट पाहत आहे.
लोक त्याच्या अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत आहेत. एका युजरने सांगितले, "अनेक प्रश्न आहेत. दोन्ही व्हिडिओमध्ये, टीटीएफ वासनने वाहतूक नियमांचे उल्लंघन केले आहे, ज्यामुळे इतर लोक त्याची कॉपी करण्यास सुरुवात करतील. तरीही त्याच्यावर योग्य कारवाई का झाली नाही? तरुणांनी अशा मूर्खपणाचा बळी पडू नये. मी तामिळनाडू पोलिसांना त्याच YouTube चॅनल ब्लॉक करण्याची विनंती करेन." एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.