शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
2
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
3
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
4
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
5
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
6
TATA IPL Auction 2025 Live: भारतीय खेळाडूंचा लिलावात बोलबाला; पंत, अय्यर अन् चहल यांच्यावर पैशांचा पाऊस
7
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
8
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
9
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
10
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल
11
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
12
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
13
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
14
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात
15
IPL 2025 Auction : नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम
16
संभलमध्ये मशिदीच्या सर्व्हेदरम्यान हिंसाचार, जाळपोळ, दगडफेक, २ जणांचा मृत्यू 
17
"संजय राऊत वेडे, त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पाहिजे’’, शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली
18
भयंकर! इन्स्टावर मैत्री, बॉयफ्रेंडसोबत लग्न करण्यासाठी ५ वर्षांच्या लेकीचा काढला काटा अन्...
19
सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग, अजित पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड

सागरपार्कच्या हॉकर्सबाबत तातडीने निर्णय घ्या फेरीवाला समिती बैठक : पर्याय मिळेपर्यंत सागरपार्कवरच व्यवसाय करून देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 07, 2016 9:37 PM

जळगाव: शहर फेरीवाला समितीच्या बैठकीत सागरपार्कवरील हॉकर्सबाबत तातडीने निर्णय घ्यावा. त्यांना पर्यायी जागा निश्चित होईपर्यंत सागरपार्कवरच व्यवसाय करण्याची परवानगी देण्याची मागणी हॉकर्सतर्फे करण्यात आली. त्यावर गटनेत्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ, असे सांगण्यात आले.

जळगाव: शहर फेरीवाला समितीच्या बैठकीत सागरपार्कवरील हॉकर्सबाबत तातडीने निर्णय घ्यावा. त्यांना पर्यायी जागा निश्चित होईपर्यंत सागरपार्कवरच व्यवसाय करण्याची परवानगी देण्याची मागणी हॉकर्सतर्फे करण्यात आली. त्यावर गटनेत्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ, असे सांगण्यात आले.
मनसेचे गटनेते ललित कोल्हे यांनीदेखील ६० दिवसांपासून हॉकर्सचा व्यवसाय बंद आहे. या हॉकर्सच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न असल्याने तातडीने हा विषय मार्गी लावावा, त्यांना पर्याय द्यावा. त्यांनी ५ पर्याय दिले आहेत. त्यावर निर्णय घ्यावा, अशी मागणी केली. उपमहापौरांनी तातडीने निर्णय घेऊन कळवितो, असे आश्वासन हॉकर्सला दिले.
मनपाच्या जागेची मागणी
यावेळी भाजीपाला विक्रेत्यांच्या प्रतिनिधींनी गोलाणीत सुविधा नाहीत. तेथे जाणार नाही. त्याऐवजी जुनी नपाच्या जागेवर बसण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली. फुले मार्केट हॉकर्स प्रतिनिधींनीही तशीच मागणी केली. मात्र उपमहापौर सुनील महाजन यांनी अशारितीने जागा देता येणार नाही. मनपाला त्यावर काही बांधकाम करावयाचे असल्याच अडचण येईल, असे सांगितले. त्यावर मनपाने खाली जागा द्यावी. वर मजले बांधले तरी चालतील, असे मत मांडले. त्यावर अनंत जोशी यांनी तेथे तळमजला चालेल तर तयार असलेले गोलाणीतील ओटे का नको? असा सवाल केला.
कालमर्यादा ठरवा
ॲड.सुरज जहाँगीर यांनी फेरीवाला धोरण व रस्ता सुरक्षा समितीचा निर्णय परस्पर विरोधी नाही. जनतेची सुरक्षितताही महत्त्वाची आहे. असे मत मांडले. तर रोटरीचे अनंत भोळे यांनी या कार्यवाहीसाठी कालमर्यादा निि›त करण्याची सूचना केली. त्यावर अतिक्रमण विभागाचे अधीक्षक एच.एम. खान यांनी ११ पर्यायी जागांचे नकाशे जवळपास तयार असून पाच-सहा दिवसांत ते हॉकर्सना पाहण्यासाठी उपलब्ध असतील, असे सांगितले. त्यावर आयुक्तांनी दहा-पंधरा दिवसांत याबाबत अंतिम प्रस्ताव महासभेपुढे ठेवू असे स्पष्ट केले. बैठकीला हॉकर्स संघटनेचे अध्यक्ष सुनील सोनार, सुनील जाधव, चंद्रकांत चौधरी, मोहन तिवारी, दिनेश हिंगणे, फुले मार्केट संघटनेचे नंदू पाटील, फारूक अहेलवाल, सावित्रीबाई भाजीपाला संस्थेचे प्रभाकर तायडे, राजेंद्र वाणी, रवी महाजन, राजेंद्र चौधरी तसेच समितीचे सदस्य उपस्थित होते.
----इन्फो----
सणांच्या बाजारासाठीही पर्याय
खाविआचे गटनेते गणेश सोनवणे यांनी पोळ्यापासून विविध सणांसाठी बाजार भरतो. त्यामुळे रस्त्यावर कोंडी होते. नियमित हॉकर्सला हटविले तरीही हा बाजार तेथे भरेल. त्यामुळे या बाजारासाठीही पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याची सूचना केली.
----इन्फो----
उपमहापौरांच्या आवाहनास प्रतिसाद
उपमहापौर सुनील महाजन यांनी शहरात ९ ते १२ दरम्यान महाआरोग्य शिबिर असून त्यासाठी बाहेरील डॉक्टरमंडळी तसेच मुख्यमंत्र्यांसह मंत्री, आमदार येत असल्याने शहर स्वच्छ व सुंदर दिसेल, अशा रितीने परिसर स्वच्छ ठेवावा, असे आवाहन केले. त्यास प्रतिसाद देत शहर हॉकर्स व टपरीधारक संघटनेने हॉकर्सला स्वच्छता राखण्याचे आवाहन निवेदनाद्वरे केले आहे.
----इन्फो----
हॉकर्स संघटनेचे आवाहन
शहरातील सर्व हॉकर्सनी फेरीवाला धोरणाच्या नियमानुसार ३ बाय ५ फूट जागेतच भाजीपाला टोपल्या ठेवाव्यात. टोपल्यांची संख्या कमी करा. लोखंडी पेट्या ठेवू नका. जास्त प्रमाणात माल साठवू नका, व्यवसाय झाल्यावर गाडी घरी घेऊन जा. वेळेचे बंधन पाळा, कचरा रस्त्यावर टाकू नका, आपल्या दुकानासमोर वाहतुकीला अडथळा होईल, अशा रितीने वाहन उभे करू देऊ नका, अंडापावच्या गाडीवर कुणी मद्यप्राशन करताना आढळल्यास त्याची नोंदणी रद्द केली जाईल. त्याची काळजी, घ्या, असे आवाहन केले आहे.