शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: अनेक मतदारसंघांमध्ये उलथापालथ; या क्षणाला कोणी घेतली आघाडी? सर्व अपडेट्स
2
बीडमधून मोठी अपडेट; परळी विधानसभेत धनंजय मुंडे पहिल्या फेरीत आघाडीवर!
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : ३५ मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी थेट लढत; कोण मारणार बाजी?
4
माहीममधून मोठी बातमी! अमित ठाकरेंची आघाडी, सदा सरवणकर पिछाडीवर
5
Maharashtra Assembly Election 2024 Result Dahisar Vidhansabha : दहिसरमधून भाजपच्या मनीषा चौधरी आघाडीवर, तिसऱ्यांदा उतरल्यात मैदानात; उबाठाचे विनोद घोसाळकर पिछाडीवर
6
Maharashtra Assembly Election Result 2024: पहिल्या १३० जागांचे कल हाती, महायुती आणि मविआत काटे की टक्कर, भाजपा वरचढ
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results: निकालापूर्वीच शरद पवार-उद्धव ठाकरेंचं सावध पाऊल; दगाफटका टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय!
8
पोस्टल मतदानात युगेंद्र पवार आघाडीवर; बारामतीत काय होणार? सर्वांचे लक्ष लागले
9
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 ५१ मतदारसंघात एकनाथ शिंदे- उद्धव ठाकरे आमनेसामने; खरी शिवसेना कुणाची जनता ठरवणार
10
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
12
'शाका लाका बूम बूम' फेम संजू अडकला लग्नाच्या बेडीत, मराठी पद्धतीने पार पडला विवाहसोहळा
13
...तर आम्हालाही आत्मरक्षणाचा अधिकार; मणिपूरचे मंत्री मैतेई यांनी दिला इशारा
14
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
15
जगभर : ‘चिरतरुण’ होण्यासाठी चरबीचं ‘इंजेक्शन’!
16
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
17
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
18
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
19
अमोल पालेकर नावाच्या ‘थोड्याशा रुमानी’ ‘आक्रिता’ची कहाणी

Farmer protest : शेतकरी आंदोलनावर सचिन, कोहलीसह क्रिकेटर्सचे ट्विट्स कसे? काँग्रेस नेते म्हणतात...

By श्रीकृष्ण अंकुश | Published: February 04, 2021 9:45 AM

या संपूर्ण प्रकरणावरून काँग्रेस नेते कार्ती चिदंबरम यांनी बीसीसीआयवर गंभीर आरोप केला आहे.

ठळक मुद्देकेंद्र सरकारने केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर गेल्या दोन महिन्यांहूनही अधिक काळापासून शेतकरी आंदोलन सुरू आहे.यासंदर्भात पॉपस्टार रिहाना, मिया खलीफा (आधीची पोर्न स्टार) आणि ग्रेटा थनबर्ग आदींनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत मोदी सरकारवर टीका केली आहे.यासंदर्भात आता माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरपासून ते अनिल कुंबळेपर्यंत आणि विराट कोहलीपासून ते शिखर धवनपर्यंत आदिंनीही ट्विट केले आहे.

नवी दिल्ली - केंद्र सरकारने केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर गेल्या दोन महिन्यांहूनही अधिक काळापासून शेतकरी आंदोलन सुरू आहे. यासंदर्भात पॉपस्टार रिहाना, मिया खलीफा (आधीची पोर्न स्टार) आणि ग्रेटा थनबर्ग आदींनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत मोदी सरकारवर टीका केली आहे. यानंतर आता माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरपासून ते अनिल कुंबळेपर्यंत आणि विराट कोहलीपासून ते शिखर धवनपर्यंत आदिंनी सरकारच्या बाजूने उभे राहत शेतकरी आंदोलनावरून सरकारवर टीका करणाऱ्या परदेशी सेलिब्रेटींना फटकारले आहे. मात्र, या संपूर्ण प्रकरणावरून काँग्रेस नेते कार्ती चिदंबरम यांनी बीसीसीआयवर गंभीर आरोप केला आहे.

"बीसीसीआय आपल्या क्रिकेटर्सना शेतकरी आंदोलनासंदर्भात जबरदस्तीने ट्विट करायला लावत आहे. हे अत्यंत बालीशपणाचे आहे. बीसीसीआयने हे थांबवायला हवे. नव्हे बीसीसीआयने, असे करू नये," असे कीर्ती चिदंबरम यांनी म्हटले आहे. कार्ती हे माजी केंद्रीय अर्थमंत्री तथा काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांचे पुत्र आहेत. 

इतरांनी हस्तक्षेप करू नये- सचिन तेंडुलकरयासंदर्भात, "भारताच्या सार्वभौत्मासंदर्भात कसल्याही प्रकराची तडजोड केली जाऊ शकत नाही. भारताच्या अंतर्गत बाबतीत बाहेरील शक्ती केवळ प्रेक्षक असू शकतात, ते याचा भाग होऊ शकत नाहीत. भारतातील नागरिक भारताला चांगले ओळखतात, यामुळे त्यांनीच भारतासंदर्भात निर्णय घ्यायला हवेत. देश एकसंध रहायला हवा, असे ट्विट सचिन तेंडुलकरने केले आहे. तसेच त्यांने आपल्या ट्विटमध्ये #IndiaTogether आणि #IndiaAgainstPropaganda या हॅश टॅग्सचाही वापर केला आहे.

Farmer Protest: सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर अन् विराट कोहलीनं केलं सरकारच्या समर्थनार्थ ट्विट

भारत आपले प्रश्न सोडवू शकतो - कुंबळेजगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून, भारत आपले अंतर्गत प्रश्न शांततेने सोडवू शकतो, असे अनिक कुंबळे यांनी म्हटले आहे.

कंगना नंतर क्रिकेटर प्रज्ञान ओझानंही पॉप स्टार रिहानाला फटकारलं, दिलं असं उत्तर

शेतकरी हा आपल्या देशाचा अविभाज्य घटक -विराट कोहलीने लिहिलं आहे की, "मतभेदांच्या या काळात आपण सर्वजण एकत्र राहू या. शेतकरी हा आपल्या देशाचा अविभाज्य घटक आहे आणि मला खात्री आहे की सर्व बाजूंनी एक समाधानकारक तोडगा काढला जाईल जेणेकरून शांतता टिकेल आणि आम्ही सर्वजण पुढे जाऊ असं त्याने म्हटलं आहे.

राजकारण तापलं, प्रियांका गांधी ट्रॅक्टर रॅलीत मृत्यू झालेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना भेटणार

सलामीवीर शिखर धवनने ट्विट करत म्हटलं आहे, “एका निष्कर्षापर्यंत पोहोचणे सध्या आपल्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. उद्याच्या भविष्यासाठी आपण एकत्रीतपणे पुढे चालूया.

रिहानानं विचारलं शेतकरी आंदोलनावर चर्चा का नाही? कंगना भडकली; म्हणाली - 'क्योंकि वो...!'

शेतकरी आंदोलनावरून देशाबाहेरील व्यक्तींनी केलेल्या ट्विट्सवर भारताच्या परराष्ट्रमंत्रालयानेही कठोर भूमिका घेतली आहे. हे बेजबाबदारपणाचे असल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे. तसेच गृहमंत्री अमित शाह यांनीही कुठल्याही प्रकारचा अपप्रचार देशाची एकात्मता तोडू शकत नाही, असे म्हटले आहे.

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपSachin Tendulkarसचिन तेंडुलकरAnil kumbleअनिल कुंबळेVirat Kohliविराट कोहलीBCCIबीसीसीआय