नवी दिल्ली: दिल्लीच्या सीमेवर गेल्या ७० दिवसांपासून केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देणारी पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गच्या अडचणीत वाढ झाली आहे. दिल्ली पोलिसांनी ग्रेटाच्या विरोधात एफआयआर दाखल केला आहे. या प्रकरणावर ग्रेटानं ट्विट करत भाष्य केलं. ग्रेटानं तिच्या ट्विटमधून आक्रमक भूमिका घेतली आहे.तेव्हा आपणही निषेध केला होताच ना?; 'त्या' विधानावरून उर्मिला मातोंडकरांचा थेट मोदींवर बाण?'मी शेतकऱ्यांसोबत उभी आहे. शेतकऱ्यांकडून सुरू असलेल्या शांततापूर्ण आंदोलनाला माझा पाठिंबा आहे. कोणत्याही प्रकारच्या द्वेषभावना, धमक्या, मानवाधिकारांचं उल्लंघन ही गोष्ट बदलू शकत नाही,' असं ग्रेटानं ट्विटमध्ये म्हटलं आहे. दिल्ली पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरनंतर ग्रेटानं हे ट्विट केलं आहे. ग्रेटाविरोधात पोलिसांनी कलम १५३ ए, १२० बीच्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. चिथावणीखोर ट्विट केल्या प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Farmer Protest: कोणत्याही धमक्या, द्वेषभावना...; पोलिसांनी गुन्हा दाखल करताच ग्रेटा थनबर्ग आक्रमक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2021 7:11 PM