शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
3
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
4
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
5
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
6
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
7
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
8
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
9
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
10
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
11
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
12
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
13
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
14
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
15
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
16
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
17
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
18
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
19
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
20
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू

तेव्हा आपणही निषेध केला होताच ना?; 'त्या' विधानावरून उर्मिला मातोंडकरांचा थेट मोदींवर बाण?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2021 2:58 PM

शेतकरी आंदोलन अंतर्गत विषय, पण...; उर्मिला मातोंडकरांकडून सरकारचा समाचार

मुंबई: गेल्या दोन महिन्यांपासून दिल्लीच्या वेशीवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावरून आता ट्विटरवर वॉर सुरू झालं आहे. पॉपस्टार रिहानानं शेतकरी आंदोलनाबद्दल ट्विट करताच बॉलिवूड सेलिब्रिटी आणि क्रिकेटपटूंनी 'इंडियाटुगेदर' असे हॅशटॅग वापरून ट्विट करण्यास सुरुवात केली. शेतकरी आंदोलन हा भारताचा अंतर्गत मुद्दा असल्याचं म्हणत सेलिब्रिटींनी बॅटिंग सुरू केली. यावर आता अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी सेलिब्रिटींना अप्रत्यक्षपणे सुनावलं आहे.'Tweet Together'... सायना नेहवालनं अक्षय कुमारचं ट्विट जसंच्या तसं कॉपी केलंदिल्लीच्या वेशीवर दोन महिन्यांपासून शेतकरी कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करत आहेत. शेतकऱ्यांच्या आंदोलनाची दखल जगभरात घेतली जात आहे. सोशल मीडिया हे व्यक्त होण्याचं माध्यम आहे. एखाद्या गोष्टीविरोधात आवाज उठवण्यासाठी सोशल मीडिया वापरला जातो, असं मातोंडकर म्हणाल्या. अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी संसद परिसरात धुडगूस घातला. त्यावेळी तिथल्या लोकशाहीवर झालेल्या हल्ल्याबद्दल आपण बोलतच होतो. तिथे झालेल्या घटनांचा आपण निषेध केला होता, याची आठवण मातोंडकर यांनी करून दिली.गाझीपूर बॉर्डरवर खिळे काढतानाच्या व्हायरल व्हिडिओ मागचं नेमकं सत्य काय? पोलिसांनी सांगितलं...अमेरिकेत सत्तांतर झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी पायउतार होण्यास नकार दिला होता. त्यांच्या समर्थकांनी संसद परिसरात गोंधळ घातला. संसदेचं नुकसान केलं. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घडल्या प्रकाराबद्दल चिंता व्यक्त केली होती. तोच धागा पकडत आपणही अमेरिकेच्या अंतर्गत प्रश्नावर बोललो होतो. आपण तिथल्या हिंसाचाराचा निषेध केला होती, याकडे मातोंडकर यांनी लक्ष वेधलं.शेतकऱ्यांचं आंदोलन हा आपला अंतर्गत विषय आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा सन्मान राखण्याची जबाबदारी सरकारची आहे. सरकारनं संवादाच्या माध्यमातून प्रश्न सोडवावा. पण शेतकऱ्यांना रोखण्यासाठी बॅरिकेड्स लावले जाणार असतील, रस्त्यावर खिळे ठोकले जाणार असतील, तर जग बोलणारच, असं मातोंडकर म्हणाल्या. आपणही तिथल्या घटनांवर, हिंसाचारावर बोललो होतोच, असं त्यांनी पुढे म्हटलं. देश सध्या नाजूक परिस्थितीतून चालला आहे. त्यामुळे शब्द जपून वापरायला हवेत, असं आवाहन त्यांनी केलं.

टॅग्स :Urmila Matondkarउर्मिला मातोंडकरShiv SenaशिवसेनाNarendra Modiनरेंद्र मोदीFarmers Protestशेतकरी आंदोलन