नवी दिल्ली : दिवाळीअगोदर देशातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पीएम किसान योजनेचा १२ वा हप्ता लवकरच जमा होणार आहे. हा हप्ता दिवाळीपूर्वी जमा होणार असल्याची माहिती समोर आली आहे. १७ किंवा १८ ऑक्टोबर रोजी पीएम किसान योजनेतील १२ वा हप्ता जमा होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
यादरम्यान, कृषी स्टार्टअप कॉन्क्लेव्ह आणि किसान संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. देशातील शेतकरी १२व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.यावेळी ई-केवायसीची प्रक्रिया आणि शेतकऱ्यांच्या डेटाबेसची पडताळणी यामुळे या हप्त्याला उशीर झाल्याचे सांगितले जात आहे.
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! PM किसान योजनेचा १२वा हप्ता या महिन्यात होऊ शकतो जमा
शेतकऱ्यांना अगोदर ई-केवायसी पूर्ण करावी लागणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी पूर्ण केलेली नाही, त्या शेतकऱ्यांचा १२ हप्ता जमा होणार नाही. सरकारने ३१ ऑगस्टपर्यंत शेवटची तारीख दिली होती. आता याची मुदत संपली आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी पूर्ण केली आहे त्यांनाच १२ वा हप्ता जमा होणार आहे.
अशी पाहा ऑनलाईन यादी
केंद्र सरकारने शेतऱ्यांसाठी पंतप्रधान किसान योजना सुरू केली आहे. या योजने अंतर्गत शेतकऱ्यांना निधी दिला जातो. या निधीसाठी आपले नाव आहे की नाही हे आता ऑनलाईन पाहता येते. यासाठी काही स्टेप्स आहेत या आपण पाहूया.
अगोदर, pmkisan.gov.in या वेबसाइटला भेट द्या. त्यानंतर पहिल्या पेजवर तुम्हाला , शेतकरी कॉर्नर नावाचा स्वतंत्र विभाग मिळेल. शेतकरी कॉर्नर विभागात 'लाभार्थी स्थिती' नावाचा टॅब आहे. त्यावर क्लिक करा. आणि तुम्ही थेट https://pmkisan.gov.in/BeneficiaryStatus.aspxया लिंकवर देखील जाऊ शकता.