ऑनलाइन लोकमत -
बेळगाव, दि. 27 - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रॅलीदरम्यान काही शेतक-यांनी आंदोलन करत रॅलीमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बेळगावमध्ये असून किसान रॅलीला संबोधित करत असताना शेतक-यांनी आंदोलन केलं आहे. आंदोलन केलेल्या शेतक-यांचा पीक विमा योजनेला विरोध आहे. त्यांनी रॅलीत घुसण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी त्यांना त्याअगोदरच रोखलं
यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगातील महत्वांच्या आर्थिक व्यवस्थेत मंदी असताना भारताचा विकास दर चांगला असल्यांचं सांगितल. जेव्हा मी दिल्लीत सत्ता हातात घेतली तेव्हा संपुर्ण देश भ्रष्टाचाराशी लढत होता. आमच्या विरोधकांनीदेखील आमच्याविरोधात कोणताही भ्रष्टाचाराचा आरोप केलेला नाही आहे. यावेळी संपुर्ण जग फक्त भारताकडेच आशेने पाहत असल्याचं नरेंद्र मोदी बोलले आहेत.
Farmers protesting against 'Fasal Bima Yojna' stopped near PM's rally venue in Belgaum(Karnataka) pic.twitter.com/lfKvy3Apr0— ANI (@ANI_news) February 27, 2016