शहरं
Join us  
Trending Stories
1
दसरा मेळाव्यात ‘आव्वाज’ कुणाचा? उद्धवसेना वि. शिंदेसेना जुगलबंदी; गर्दीचा उच्चांक कोण मोडेल?
2
पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यास जरांगेंचे आव्हान; भगवान भक्तिगडावर मुंडे; नारायणगडावर पाटील
3
युद्धाने समस्या सुटणार नाहीत, शक्य तितक्या लवकर शांतता, स्थिरता पुनर्स्थापित करावी: PM मोदी
4
टाटा ट्रस्टची धुरा नोएल टाटांकडे; उत्तराधिकारी निवडला, ‘टाटा ट्रस्ट्स’च्या चेअरमनपदी निवड
5
उड्डाणानंतर विमानात बिघाड, काही तास घिरट्या, सुखरूप लॅंडिंग; पायलटमुळे प्रवाशांचे प्राण वाचले
6
सीमेपलीकडून १५० दहशतवादी भारतात घुसखोरीच्या तयारीत; सुरक्षा दलांना अधिक सतर्कतेचा इशारा
7
फ्लाइट अन् फाइटसाठीही तयार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विधानसभेसाठी सज्जतेचे संकेत
8
निवडणुकीच्या तोंडावर ‘सोशल इंजिनीअरिंग’; विविध समाजांसाठी महामंडळे स्थापन करण्याचा सपाटा
9
‘लाडक्या’ योजना हव्या, तर मत द्या; विकासासाठी पुन्हा महायुती सरकार आणावे लागेल: CM शिंदे
10
राजेगटाचं ठरलं! बंधू संजीवराजे ‘तुतारी’ घेणार; रामराजे महायुतीचा प्रचार करणार नाहीत
11
“राजकारणात बजबजपुरी, आता कोण कुठे असेल काही सांगता येत नाही”: संभाजीराजे
12
“हरयाणात जे घडले ते महाराष्ट्रात कदापि घडणार नाही, कारण...”: प्रणिती शिंदे
13
रिपाइंला ८ ते १० जागा हव्यात; निवडणूक आमच्याच चिन्हावर लढणार: रामदास आठवले
14
भाजप नेते अजित पवार यांना साइड ट्रॅक करताहेत; विजय वडेट्टीवार यांचा आरोप
15
महादेव ॲप प्रवर्तक चंद्राकरला अखेर बेड्या; दुबईत अटक, लवकरच होणार प्रत्यार्पण
16
लक्ष्मण हाकेंचीही पंकजा मुंडेंना साथ; दसरा मेळाव्याला हजर राहण्याची घोषणा करत म्हणाले...
17
एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड, दोन तास प्रवाशांचा जीव टांगणीला, अखेर सुरक्षित लँडिंग
18
न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा; बुमराहला पुन्हा उप कॅप्टन्सीचा मान
19
MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; 'या' दोन परीक्षांबाबत आयोगाने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय!
20
राजेगटाचं अखेर ठरलं! संजीवराजेंच्या नेतृत्वात तुतारी हाती घेणार; रामराजे नक्की काय करणार?

शेतकरी आंदोलन : गाझीपूर बॉर्डरवर शेतकऱ्याची 'सुसाईड नोट' लिहून आत्महत्या, शौचालयात घेतली फाशी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 02, 2021 1:52 PM

आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव कश्मीर सिंग, असे आहे. हा शेतकरी यूपीतील रामपूरचा रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. कश्मीर सिंग यांनी आत्महत्येपूर्वी एक कथित सुसाईड नोट लिहिली आहे. यात त्याने शेतकरी आंदोलनासंदर्भात एक आवाहनही केले आहे.

ठळक मुद्देया शेतकऱ्याने दिल्ली सीमेवरील गाझीपूर बॉर्डरवर आंदोलन स्थळी तयार करण्यात आलेल्या एका शौचालयात फाशी घेऊन आत्महत्या केली. गेल्या 38 दिवसांपासून शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत.कश्मीर सिंग यांनी आत्महत्येपूर्वी एक कथित सुसाईड नोट लिहिली आहे.

गाझियाबाद - केंद्र सरकारने नुकतेच तीन नवे कृषी विषयक कायदे लागू केले आहेत. हे तीनही कायदे शेतकरीविरोधी असल्याचे म्हणत, सरकारने ते तत्काळ मागे घ्यावेत, या मागणीला घेऊन गेल्या 38 दिवसांपासून शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. हे आंदोलन सुरू असतानाच शनिवारी एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली. या शेतकऱ्याने दिल्ली सीमेवरील गाझीपूर बॉर्डरवर आंदोलन स्थळी तयार करण्यात आलेल्या एका शौचालयात फाशी घेऊन आत्महत्या केली आहे. 

आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव कश्मीर सिंग, असे आहे. हा शेतकरी यूपीतील रामपूरचा रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. कश्मीर सिंग यांनी आत्महत्येपूर्वी एक कथित सुसाईड नोट लिहिली आहे. यात त्याने शेतकरी आंदोलनासंदर्भात एक आवाहनही केले आहे.

सुसाईड नोटमध्ये काय लिहिले - आत्महत्याग्रस्त शेतकरी काश्मीर सिंग यांची सुसाईड नोट आढळून आली आहे. यात त्यांनी लिहिले आहे, की त्यांचे बलिदान व्यर्थ जाऊ नये. तसेच आपल्यावर दिल्ली आणि उत्तर प्रदेशातील सीमेवरच अंत्यसंस्कार करण्यात यावेत.

हृदयविकाराच्या झटक्याने एका शेतकऱ्याचा मृत्यू - तत्पूर्वी गाझीपूर सीमेवर शुक्रवारी एका शेतकऱ्याची हृद्यविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. मोहन सिंग (57) असे या शेतकऱ्याचे नाव होते. ते बागपत जिल्ह्यातील गवानपूरमधील नांगल गावचे रहिवासी होते. यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

सोमवारी चर्चेची पुढची फेरी -आंदोलनाची पुढील रणनीती ठरवण्यासाठी शुक्रवारी शेतकरी संघटनांनी दिल्ली-हरयाणाला जोडणाऱ्या सिंघू सीमेवर बैठक घेतली. शेतकरी आणि सरकारमध्ये सोमवारी 4 जानेवारीला चर्चेची पुढची फेरी होणार आहे. बुधवारी ३० डिसेंबर रोजी सरकार आणि शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींमध्ये बैठक पार पडली. त्यात सरकारने वीज अधिनियम सुधारणा कायदा रद्द करणे आणि दिल्ली व परिसर प्रदूषण नियंत्रण कायद्यातील दंडात्मक तरतुदी मागे घेण्याचे आश्वासन शेतकरी संघटनांना दिले. परंतु तिन्ही कृषी कायदे मागे घेणे आणि किमान हमी भावाला कायदेशीर संरक्षण देणे या मुद्द्यांवर कोणताही तोडगा निघू शकला नाही. 

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपfarmer suicideशेतकरी आत्महत्याdelhiदिल्लीHaryanaहरयाणा