केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांना (Farm Laws) विरोध करण्यासाठी गेल्या चार महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलनाला बसले आहेत. आज चार महिने पूर्ण होणार असल्याने संयुक्त किसान मोर्चाने १२ तासांचा भारत बंद पुकारला आहे. याचे पडसाद उत्तर भारतात दिसू लागले आहेत. दिल्ली-गाझीपूर सीमेवर आंदोलकांनी पुन्हा एकदा हायवे बंद केला आहे. (Protesters block the Ghazipur border (Delhi-UP border) in view of 12-hour 'Bharat Bandh' call by Samyukt Kisan Morcha against Centre's Farm Laws)
गाझीपूर सीमेवर शेतकरी आंदोलनाला बसल्याने पोलिसांनी वाहतूक बंद ठेवली आहे. शेतकरी रस्त्यावर बसून आंदोलन करत आहेत. दिल्लीच्या ज्या सीमांवर आंदोलन सुरु आहे त्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. सकाळी ६ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत हे आंदोलन सुरु राहणार आहे. संयुक्त मोर्चाचे नेते बलबीर सिंग राजेवाल यांनी सांगितले की, रस्ते आणि रेल्वे वाहतूक बंद केली जाणार आहे. बाजारदेखील बंद केले जाणार असल्याचे ते म्हणाले.