खेड सेझ प्रकल्पात शेतकर्यांची फसवणूक
By admin | Published: September 30, 2014 9:39 PM
शेतकरी संघटनेचा आरोप, प्रकल्पाची चौकशी करण्याची मागणी पुणे : स्पेशल इकोनॉमिक झोन (सेझ) अंतर्गत खेड येथील शेतकर्यांची १२०७ हेक्टर जमिन संपादीत करण्यात आली होती. आता तीच जमिन विमानतळासाठी देण्यात येणार आहे. औद्योगिक कारणासाठी घेतलेली जमिन इतर कारणासाठी वर्ग करण्याचा प्रकार म्हणजे शेतकर्यांची फसवणूक असल्याचा आरोप शेतकरी संघटनेने केला आहे. त्या ...
शेतकरी संघटनेचा आरोप, प्रकल्पाची चौकशी करण्याची मागणी पुणे : स्पेशल इकोनॉमिक झोन (सेझ) अंतर्गत खेड येथील शेतकर्यांची १२०७ हेक्टर जमिन संपादीत करण्यात आली होती. आता तीच जमिन विमानतळासाठी देण्यात येणार आहे. औद्योगिक कारणासाठी घेतलेली जमिन इतर कारणासाठी वर्ग करण्याचा प्रकार म्हणजे शेतकर्यांची फसवणूक असल्याचा आरोप शेतकरी संघटनेने केला आहे. त्या विरोधात दिवाळीत आंदोलन पुकारण्याचा इशारा देण्यात आला आहे. औद्योगिक विकास महामंडळाद्वारे २००८ साली सेझ करीता खेड येथील जमिन संपादीत करण्यात आली होती. शेतकर्यांना त्या साठी १७ लाख रुपये प्रतिहेक्टर दर देण्यात आला. विशेष पॅकेज नुसार संपादीत जमिनीच्या बदल्यात १५ टक्के परतावा विकसित जमिनीच्या स्वरुपात मूळ मालकांना देण्याचे मान्य करण्यात आले होते. येथील जमिनी खेड इकोनॉमिक इन्फ्रान्सट्रक्चर लिमिटेड (केईआयएल) नावाने संपादीत करण्यात आल्या होत्या. शेतकर्यांना खरेदी रक्कम देताना विकसित जमिनीच्या डेव्हलपमेंट चार्जेसची २२.५ टक्के रक्कम कपात करुन देण्यात आली होती. त्यानंतर पुढे खेड डेव्हलपर्स लिमिटेड नावाने कंपनी स्थापन करण्यात आली. या कंपनीचे भागभांडवल ५७ कोटी रुपये दाखविण्यात आले. शेतकर्यांना त्याचे जमिनीच्या हिश्या प्रमाणे समभाग देण्यात आले. सेझ प्रकल्पासाठी जमिन संपादीत करताना खेड डेव्हलपर्सचा उल्लेख देखील नव्हता. असे असतानाही या कंपनीचे समभाग शेतकर्यांच्या गळ्यात मारण्यात आले. या कंपनीत २५ टक्के भाग केईआयएलकडे तर ७५ टक्के भाग शेतकर्यांकडे आहेत. भागभांडवलाची रक्कम देखील केईआयएल वापरीत आहे. यातून पद्धतशीरपणे शेतकर्यांची फसवणूक करण्यात आली आहे. प्रकल्पबाधित शेतकर्यांना १५ टक्के जमिन देण्यात यावी व कंपनीच्या व्यवहारांची चौकशी करावी अशी मागणी खासदार राजू शेी यांनी केली आहे. दिवाळीपुर्वी त्याबाबतचे लेखी आश्वासन न मिळाल्यास या कंपनीशी संबंधित उद्योजक बाबा कल्याणी यांच्या घरासमोर बळीप्रतिपदेला (२४ ऑक्टोबर) आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.