Rakesh Tikait Meet Rahul Gandhi: राकेश टिकैत भारत जोडो यात्रेत! राहुल गांधींची घेतली भेट; शेतकरी प्रश्नांवर होता चर्चेचा भर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2023 10:45 AM2023-01-10T10:45:47+5:302023-01-10T10:46:54+5:30

Rakesh Tikait Meet Rahul Gandhi: राहुल गांधी यांच्या भेटीत विविध राज्यांमधील शेतकऱ्यांच्या समस्येवर चर्चा केल्याची माहिती राकेश टिकैत यांनी दिली.

farmers leader rakesh tikait meets rahul gandhi in bharat jodo yatra | Rakesh Tikait Meet Rahul Gandhi: राकेश टिकैत भारत जोडो यात्रेत! राहुल गांधींची घेतली भेट; शेतकरी प्रश्नांवर होता चर्चेचा भर

Rakesh Tikait Meet Rahul Gandhi: राकेश टिकैत भारत जोडो यात्रेत! राहुल गांधींची घेतली भेट; शेतकरी प्रश्नांवर होता चर्चेचा भर

googlenewsNext

Rakesh Tikait Meet Rahul Gandhi: काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) सुरू आहे. देशभरातील अनेक राज्यांमधून प्रवास करत ही यात्रा आता हरियाणा येथे पोहोचली आहे. आतापर्यंत हजार किमीचा प्रवास या यात्रेच्या निमित्ताने राहुल गांधी यांनी केला आहे. ज्या ज्या राज्यात यात्रा गेली, तिथे काँग्रेसला आणि राहुल गांधी यांना प्रचंड पाठिंबा आणि समर्थन मिळाल्याचे सांगितले जात आहे. अनेक कलाकार, दिग्गज मंडळी, अधिकारी या यात्रेत सहभागी झाले. यातच आता भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रेत भेट घेतली.

राकेश टिकैत यांनी ट्विट करून याबाबतची माहिती दिली. या ट्विटमध्ये राकेश टिकैत यांनी राहुल गांधी यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये भगव्या रंगाचा गमछा घातलेला राकेश टिकैत राहुल गांधींशी हस्तांदोलन करताना दिसत आहे. राकेश टिकैत यांच्यासोबत शेतकरी नेते योगेंद्र यादव यांनीही राहुल गांधी यांची भेट घेतली. 

विविध राज्यांमधील शेतकऱ्यांच्या समस्येवर चर्चा

राकेश टिकैत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, हरियाणातील अंबाला जिल्ह्यात राहुल गांधी यांची भेट घेतली आणि शेतकऱ्यांच्या समस्यांवर चर्चा केली. या चर्चेत छत्तीसगड येथील नवा रायपूर किसान आंदोलन, तसेच हिमाचल प्रदेश आणि राजस्थानसह इतर राज्यांतील शेतकरी प्रश्नांवर चर्चा झाली, अशी माहिती राकेश टिकैत यांनी दिली. दुसरीकडे, तृणमूल काँग्रेसचे नेते शत्रुघ्न सिन्हा यांनी राहुल गांधी यांचे कौतुक केले आहे. राहुल गांधी हे विरोधी पक्षातून पंतप्रधानपदाचे प्रबळ दावेदार आहेत, असे शत्रुघ्न सिन्हा यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, राहुल गांधींची ३,५७० किलोमीटरची यात्रा ऐतिहासिक यात्रांपैकी एक आहे आणि या यात्रेची तुलना १९९० च्या दशकाच्या सुरुवातीला झालेल्या लालकृष्ण अडवाणींच्या राम रथयात्रेशी केली जाऊ शकते. या यात्रेतून राहुल गांधी एक प्रमुख आणि आदरणीय नेते म्हणून उदयास आले आहेत. ते आता पंतप्रधानपदासाठी अत्यंत सक्षम दिसत आहेत, असेही शत्रुघ्न सिन्हा यांनी म्हटले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: farmers leader rakesh tikait meets rahul gandhi in bharat jodo yatra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.