शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन्ही उपमुख्यमंत्री निवडणूक रिंगणात; विठ्ठलाच्या महापूजेचा मान कोणाला मिळू शकतो? जाणून घ्या
2
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या प्रचार सभांचा धडाका; 'या' दिवशी पहिली सभा कोल्हापुरात
3
'स्विंग स्टेट्स' ठरवणार अमेरिकेचा नवा राष्ट्राध्यक्ष! ट्रम्प २० राज्यांत; कमला १० राज्यांत विजयी
4
अखेरची निवडणूक असल्याने माझा सन्मान राखावा; शहाजीबापू पाटलांचं जनतेला भावनिक आवाहन 
5
भाजपकडून बंडखोरांवर मोठी कारवाई, राज्यातील ४० नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
6
आजचे राशीभविष्य, ६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कन्येसाठी काळजीचा दिवस
7
कोण होणार अमेरिकेचा अध्यक्ष ट्रम्प की हॅरिस? 40 वर्षांत ज्यांची भविष्यवाणी कधी खोटी ठरली नाही त्यांनी सांगितलं
8
US Election Share Market : ट्रम्प यांच्या पुन्हा सत्तेत येण्याचे संकेत, भारतीय शेअर बाजारात तेजी; निफ्टी २४,३०० च्या वर
9
SSY की SIP…मुलीच्या भविष्यासाठी कुठे गुंतवावा पैसा, कनफ्युज असाल तर समजून कुठे मिळेल जास्त पैसा?
10
इस्रायलचा गाझामध्ये पुन्हा मोठा हल्ला! एअरस्ट्राइकमध्ये महिला-मुलांसह ३० जणांचा मृत्यू
11
१६ दिवसांत ४८ लाख जोड्या अडकणार रेशीमगाठीत, ६ लाख कोटींची उलाढाल?
12
सरकार 'या' कंपनीतील २.५ टक्के हिस्सा विकणार; ५०५ रुपये प्रति शेअर किंमत झाली निश्चित, जाणून घ्या
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: मुंबईत आज इंडिया आघाडीची पहिली सभा; राहुल गांधी संबोधित करणार
14
'कार्तिकी' यात्रेसाठी रेल्वेकडून विशेष गाड्या, भाविकांसाठी मध्य रेल्वेचे नियोजन
15
नेमक्या कोणत्या कारणांमुळे रश्मी शुक्लांची झाली उचलबांगडी? समोर आली अशी माहिती
16
मुंबईत आव्वाज कुणाचा? उत्तर आणि उत्तर पश्चिम मुंबईत चुरशीच्या लढती, महायुती, मविआमुळे काही मतदारसंघांचे गणित बदलणार
17
सत्तेत आल्यास मुलांनाही मोफत शिक्षण, उद्धव ठाकरे यांचे आश्वासन, कोल्हापुरातून प्रचाराचा फोडला नारळ
18
'मिरज पॅटर्न' चौथ्यांदा चालेल? भाजपाच्या सुरेश खाडे यांच्यासमोर महाविकास आघाडीचे आव्हान, तानाजी सातपुते यांच्याशी लढत
19
सर्वच खासगी मालमत्ता जप्तीचा सरकारला अधिकार नाही, सर्वोच्च न्यायालयाच्या नऊ न्यायाधीशांच्या खंडपीठाचा ७:२ बहुमताने निकाल
20
आता पोलिसांसह प्रत्येक सरकारी वाहनाचे चेकिंग, शरद पवारांच्या आरोपाची आयोगाकडून दखल

लखीमपूर हिंसाचाराप्रकरणी शेतकऱ्यांचे राष्‍ट्रपतींना पत्र, केंद्रावर केले गंभी आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2021 1:15 PM

Lakhimpur Kheri Violence:संयुक्त किसान मोर्चाने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र लिहून या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.

लखीमपूर:उत्तर प्रदेशच्या लखीमपूरमध्ये शेतकरी आणि केंद्रीय मंत्र्याच्या मुलामध्ये झालेल्या संघर्षानंतर झालेल्या हिंसक घटनेत 9 जणांचा मृत्यू झाल्यामुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे. यामुळे विरोधी पक्ष आणि आंदोलक शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप आहे. यातच आता संयुक्त किसान मोर्चाने या प्रकरणाबाबत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र लिहून या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.

या पत्रात गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांची हकालपट्टी, त्यांचा मुलगा आशिष मिश्रा यांच्यावर 302 अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करणे, तपासासाठी एसआयटी स्थापन करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच, पत्रात हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्यावर हिंसा भडकवल्याचा आरोप करण्यात आला आहे, त्यांना मुख्यमंत्रिपदावरून काढून टाकावे असेही या पत्रात म्हटले आहे.

'उत्तर प्रदेश आणि केंद्र सरकारचे षड्यंत्र'

संयुक्त किसान मोर्चाने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना लिहिलेल्या पत्रात केंद्र आणि राज्य सरकारवर आरोप करण्यात आले आहेत. 3 ऑक्टोबर रोजी लखीमपूर खीरीमध्ये दिवसाढवळ्या शेतकऱ्यांना तुडवून ठार मारण्याची घटना निंदनीय आहे. केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा तेनींच्या सहकाऱ्यांसह त्यांच्या मुलाने क्रुरपणे हल्ला केला. हा केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकारचा मोठा कट आहे, असे या पत्रात म्हटले आहे.

यूपी सरकारने पंजाबला पत्र लिहिलेदरम्यान, उत्तर प्रदेश सरकारने पंजाबच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून राज्याला विनंती केली की कोणालाही लखीमपूर खीरीला जाऊ देऊ नका. काल लखीमपूर खेरी येथे झालेल्या हिंसाचारात 9 लोकांचा मृत्यू झाल्यानंतर सीआरपीसीचे कलम 144 लागू करण्यात आले आहे. उत्तर प्रदेशच्या शेजारील राज्यांच्या सीमेवर सखोल तपासणी मोहीम राबवली जात आहे. अशा स्थितीत, डीएनडी टोल प्लाझावर दिल्लीच्या बाजूने यूपीमध्ये प्रवेश करणाऱ्या सर्व वाहनांना तपासणी केल्यानंतरच यूपी सीमेत प्रवेश दिला जात आहे. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशlakhimpur-pcलखीमपुरFarmers Protestशेतकरी आंदोलनRamnath Kovindरामनाथ कोविंद