शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

शेतकऱ्यांना रोख मदतीची योजना केंद्राच्या विचाराधीन?; लोकसभा निवडणुकीवर डोळा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 01, 2019 6:26 AM

तीन राज्यांमध्ये सत्तेवर येताच काँग्रेसने तेथे शेतक-यांना कर्जमाफी जाहीर केली असली तरी संपूर्ण देशाच्या पातळीवर अशी कर्जमाफी देणे खिशाला परवडणारी नसल्याने त्रस्त शेतकरीवर्गाला दिलासा देण्याच्या अन्य पर्यायांवर मोदी सरकार विचार करत असल्याचे कळते.

नवी दिल्ली : गेल्या महिन्यातील विधानसभा निवडणुकांमध्ये मध्य प्रदेश, राजस्थान व छत्तीसगढ या तीन राज्यांमधील सत्ता गमावलेली भाजपा तेच लोण आगामी लोकसभा निवडणुकीत पोहोचू नये यासाठी सर्वात जास्त नाराज असलेल्या शेतकरी या मतदारवर्गाला गोंजारण्यासाठी गांभीर्याने कामाला लागली आहे. तीन राज्यांमध्ये सत्तेवर येताच काँग्रेसने तेथे शेतक-यांना कर्जमाफी जाहीर केली असली तरी संपूर्ण देशाच्या पातळीवर अशी कर्जमाफी देणे खिशाला परवडणारी नसल्याने त्रस्त शेतकरीवर्गाला दिलासा देण्याच्या अन्य पर्यायांवर मोदी सरकार विचार करत असल्याचे कळते.सरकारमधील वरिष्ठ माहीतगार सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दोन-तीन पर्यायांवर विचार सुरू असून यापैकी कोणता पर्याय स्वीकारायचा याचा निर्णय लवकरच अपेक्षित आहे. लोकसभा निवडणूक कदाचित एप्रिलमध्येही होण्याची शक्यता असल्याने येत्या तीन महिन्यांत तुमच्यासाठी काही तरी केले हे शेतकºयांना दाखविणे गरजेचे आहे.सूत्रांनुसार यापैकी एक पर्याय शेतकºयांना दरमहा ठरावीक रोख रक्कम आर्थिक मदत म्हणून देण्याचा आहे. सरकारने शेतमालांचे वाढीव हमीभाव जाहीर केले तरी त्या भावाने सर्व शेतमाल खरेदी करण्याची क्षमता सरकारी यंत्रणेत नाही. त्यामुळे नडलेल्या शेतकºयांना हमीभावाहून कमी दराने आपला माल विकावा लागतो, हा सार्वत्रिक अनुभव आहे. यावर उपाय म्हणून हा रोख रक्कम देण्याच्या पर्यायावर विचार करण्यात येत आहे. संबंधित शेतमालाचा हमीभाव आणि शेतकºयाला प्रत्यक्षात मिळालेला दर याच्या फरकाची रक्कम त्याला द्यायची, अशी ही कल्पना आहे. मात्र ही रक्कम एकदम न देता दरमहा ठरावीक हप्त्याच्या स्वरूपात दिली की शेतकºयाला पुढच्या हंगामापर्यंत कुटुंबाचा चरितार्थ चालविणे अधिक सोयीचे होईल, अशी यामागची कल्पना आहे. अशी योजना राबविल्यास देशभरातील १५ कोटी शेतकरी कुटुंबांना मदतीचा हात दिल्यासारखे होईल. संभाव्य मतांच्या हिशेबाने ही संख्या ३० ते ४० कोटींच्या घरात जाऊ शकते.सूत्रांनी असेही सांगितले की, अशा शेतकºयांना रोख मदत देणे सरकारच्या दृष्टीनेही किफायतशीर आहे. शेतकºयांचा सर्व शेतमाल हमीभावाने खरेदी करायचा झाल्यास जेवढा बोजा पडेल त्याच्या तुलनेत हा बोजा खूपच कमी असेल. शिवाय ही मदत दरमहा थोडी-थोडी द्यायची असल्याने तिजोरीवरील ताणही १२ महिन्यांत विभागला जाईल.शेतकºयांचे उत्पन्न सन २०२२ पर्यंत दुप्पट करण्याच्या वचनाच्या पूर्ततेचा भाग म्हणून सरकारने मध्यंतरी कापूस, सोयाबीन आणि भात यासारख्या पिकांच्या आधारभूत किमती किमान ५० टक्क्यांनी वाढविल्या. पण त्या भावाने शेतमाल खरेदी करण्याची व साठविण्याची सोय नसल्याने शेतक-यांना त्याचा फारसा फायदा झाला नाही.सुधारित पिकविमा योजनागेल्या दोन वर्षांचा अनुभव पाहता गोळा होणा-या विमा हप्त्याच्या तुलनेत मिळणारी विम्याची रक्कम तुटपुंजी असल्याने विमा कंपन्याच मालामाल होत असल्याचे चित्र आहे.ते बदलण्यासाठी शेतकºयांना भरावा लागणारा विमा हप्ता कमी करणे, विम्याच्या कक्षेत अधिक पिके आणणे आणि खंडकरी शेतकºयांनाही विम्याचा लाभ देणे असे उपाय तपासून पाहिले जात आहेत.सूत्रांनुसार ज्या दुसºया पर्यायावर विचार सुरू आहे तो मोठा गाजावाजा करून सुरू केलेली प्रधानमंत्री कृषिविमा योजना अधिक शेतकरीस्नेही करण्याचा आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी