नवी दिल्ली: केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या ७० दिवसांपासून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. दिल्लीच्या सीमेवर हजारो शेतकरी आंदोलन करत आहेत. तिन्ही कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीवर शेतकरी ठाम आहेत. शेतकरी आणि सरकारमध्ये बैठकांच्या अनेक फेऱ्या झाल्यावरही या प्रश्नी तोडगा निघालेला नाही. त्यामुळे आता भारतीय किसान युनियननं चक्का जाम आंदोलनाची घोषणा केली आहे. ६ फेब्रुवारीला शेतकऱ्यांकडून चक्का जाम आंदोलन करण्यात येईल.शेतकरी आंदोलन कसं संपवावं लागेल? माजी पंतप्रधानांनी सांगितला मोठा मार्ग६ फेब्रुवारीला राष्ट्रीय, राज्य महामार्गांवर चक्का जाम करण्यात येणार आहे. दिल्लीसोबतच दिल्लीच्याबाहेर चक्का तीन तासांसाठी चक्का जाम केला जाईल, अशी माहिती भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी दिली. 'चक्का जाम आंदोलनावेळी वाहतूक कोंडीत अडकणाऱ्यांना पाणी आणि जेवण देण्यात येईल. सरकार आमच्यासोबत कशा प्रकारचं वर्तन करतंय याची माहितीदेखील आम्ही वाहतूक कोंडीत अडकलेल्यांना प्रवाशांना देऊ,' असं टिकैत यांनी सांगितलं.
Farmers Protest: ६ फेब्रुवारीला 'चक्का जाम', जे जे रस्त्यात अडकणार त्यांना...; टिकैत यांची 'अनोखी' घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2021 5:54 PM