नवी दिल्ली - शेतमालाला दीडपट हमीभाव, कर्जमाफी अशा विविध मागण्यांसाठी देशभरातील हजारो शेतकरी आज राजधानी नवी दिल्लीत धडकले आहेत. दरम्यान, या शेतकऱ्यांना संबोधित करताना सीपीआय (एम) चे नेते सीताराम येचुरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष अमित शाह यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. मोदी आणि शाह म्हणजे आजच्या काळातील दुर्योधन आणि दु:शासन आहेत, असे येचुरी यांनी म्हटले. तसेच भाजपा आणि संघाकडे निवडणूक जिंकण्यासाठी केवळ राम मंदिराचा मुद्दाच शिल्लक राहिला आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. शेतकऱ्यांना संबोधित करताना येचुरी म्हणाले, ''नरेंद्र मोदी आणि आरएसएसकडे आता केवळ राम मंदिर हा एकच मुद्दा उरला आहे. त्यामुळे निवडणूक जवळ आल्यावर त्यांनी राम नामाचा जप सुरू केला आहे." दरम्यान, राजधानीमध्ये आलेल्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी विरोधी पक्षाच्या नेत्यांनी गर्दी केली आहे. यावेळी स्वराज इंडियाचे प्रमुख योगेंद्र यादव यांनी ''नरेंद्र मोदी, किसान विरोधी'' हा नारा शेतकऱ्यांनी लक्षात ठेवावा, असे आवाहन केले.
Farmers protest in Delhi : मोदी आणि शाह म्हणजे दुर्योधन आणि दु:शासन, सीताराम येचुरींची घणाघाती टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2018 4:07 PM
शेतमालाला दीडपट हमीभाव, कर्जमाफी अशा विविध मागण्यांसाठी देशभरातील हजारो शेतकरी आज राजधानी नवी दिल्लीत धडकले आहेत.
ठळक मुद्दे शेतमालाला दीडपट हमीभाव, कर्जमाफी अशा विविध मागण्यांसाठी देशभरातील हजारो शेतकरी आज राजधानी नवी दिल्लीत धडकले आहेत. या शेतकऱ्यांना संबोधित करताना सीपीआय (एम) चे नेते सीताराम येचुरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष अमित शाह यांच्यावर घणाघाती टीका केलीमोदी आणि शाह म्हणजे आजच्या काळातील दुर्योधन आणि दु:शासन आहेत, असे येचुरी यांनी म्हटले