शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

Farmers Protest: दिल्लीत राजपथावर देशाचे शक्तिप्रदर्शन; शेवटचा ट्रॅक्टर संपेपर्यंत ही रॅली सुरू राहील

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2021 3:10 AM

रॅलीमध्ये केवळ पाच हजार लोक असावेत असे पोलीस आणि शेतकऱ्यांच्या चर्चेअंती ठरले असले तरी लाखो शेतकरी यात सहभागी होत आहेत.

विकास झाडे

नवी दिल्ली : दिल्लीच्या तीन सीमेवरून शेतकऱ्यांची ट्रॅक्टर रॅली निघत आहे. त्यात टीकरी, सिंघू आणि गाझीपूर या तीन सीमांचा समावेश आहे. शासकीय परेड आटोपल्यानंतर शेतकऱ्यांची रॅली सुरू करावी, अशा प्रशासनाच्या सूचना असल्या तरी सकाळी ९ वाजता शेतकरी रॅलीला सुरुवात करणार आहेत. जवळपास ३७० कि.मी.च्या परिघात ही रॅली असेल. यात कवायतीपासून देशप्रेमावर आधारित विविध कार्यक्रमांचे सादरीकरण होणार आहे. विशेष म्हणजे शेवटचा ट्रॅक्टर संपेपर्यंत ही रॅली सुरू राहील. त्यासाठी तीन दिवस लागू शकतात.

शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आज दोन महिने झालेत. केंद्र सरकारने तिन्ही कृषी कायदे मागे घ्यावेत आणि एमएसपी कायदा लागू करावा म्हणून दिल्लीतील सहा सीमा अडवल्या आहेत. सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये अकरा बैठका होऊनही कोणताही तोडगा निघू शकला नाही. एक महिन्याभरापूर्वीच शेतकऱ्यांनी प्रजासत्ताकदिनी ट्रॅक्टर रॅली काढण्याची घोषणा केली होती. प्रशासनाने मान्यता दिल्याप्रमाणे उद्या तीन सीमांवरून प्रचंड रॅली निघत आहे.

टीकरी सीमेहून ११० कि.मी. तर सिंघू सीमेहून ९० कि.मी. रॅली काढली जाणार आहे. गाझीपूर सीमेवरून निघणाऱ्या रॅलीचा परिघ हा जवळपास ७० कि.मी. असेल. पलवलचे शेतकरी टीकरी सीमेवर जातील तर शहाजापूरचे शेतकरी गाझीपूर सीमेवर पोहोचले आहेत. ज्या सीमेवरून ही रॅली सुरू होईल तिथेच परत येणे बंधनकारक आहे. या रॅलीवर दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाणा पोलिसांची नजर असणार आहे. रॅलीदरम्यान कोणतीही अनुचित घटना होऊ नये यासाठी सावधानता बाळगली जाणार आहे. रॅली सुरू होण्याची वेळ दुपारी १२ची आहे. परंतु सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शेतकरी सकाळी ९ वाजता रॅली सुरू करणार आहेत. ही रॅली संपायला तीन दिवस लागू शकतात, असे शेतकरी नेत्यांनी सांगितले. रॅलीमध्ये केवळ पाच हजार लोक असावेत असे पोलीस आणि शेतकऱ्यांच्या चर्चेअंती ठरले असले तरी लाखो शेतकरी यात सहभागी होत आहेत. त्यामुळे सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण होत आहे.

यंदा राजपथवर नसेल विदेशी पाहुणा!

प्रजासत्ताकदिनी राजपथवर विदेशातील पाहुणे हजेरी लावतात. त्यांना देशाच्या प्रगतीचे दर्शन होते. परंतु उद्या कोणताही विदेशी पाहुणा नसणार आहे. कोरोनामुळे यंदा पाहुणे रद्द झालेत. याआधी १९५२, १९५३ आणि १९६६मध्ये विदेशी पाहुणे विविध कारणाने अनुपस्थित होते.

लवकरच आंदोलन संपेल!

उद्या शेतकऱ्यांच्या रॅलीवर केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी नाराजी व्यक्त केली. परंतु शेतकऱ्यांसोबत सरकारची सकारात्मक चर्चा सुरू असून लवकरच हे आंदोलन संपुष्टात येईल असे संकेत त्यांनी दिलेत.

संसदेला घेराव!

आज संयुक्त किसान मोर्चाची बैठक झाली. त्यात १ फेब्रुवारी रोजी संसदेला शेतकरी घेराव घालणार आहेत. आहे त्या सीमेहून शेतकरी चालत संसदेकडे येतील.

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपagricultureशेतीNarendra Modiनरेंद्र मोदी