शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या एक दिवस आधीच ठाकरे गटाला धक्का; डोंबिवलीतील नाराजीचा शिंदे गटाला फायदा
2
Maharashtra Election 2024: ‘या’ मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदार लढवत नाहीये निवडणूक! काय आहेत कारणे?
3
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
4
"...अन्यथा माझा बाबा सिद्दिकी व्हायला वेळ लागणार नाही", शरद पवार गटाच्या रमेश कदमांना जीवे मारण्याची धमकी 
5
नीरव मोदी-विजय माल्ल्यावर कारवाई होणार! PM मोदींनी ब्रिटनसमोर उपस्थित केला मुद्दा
6
ऐन निवडणुकीत पक्षाकडून निलंबन; सांगता सभेत शरद पवारांबद्दल काय म्हणाले राहुल जगताप?
7
"...तर उद्धव ठाकरे यांच्यावर FIR का दाखल होत नाही? त्यांना आत का टाकत नाही?"; रामदास कदम यांचा सवाल
8
मराठी-हिंदी गाणी गाणाऱ्या प्रसिद्ध गायकाने गमावलेला आवाज, २ वर्षांनी केला खुलासा
9
या सगळ्या अफवा! असित मोदींसोबतच्या भांडणावर जेठालालचं स्पष्टीकरण, म्हणाले- "मी हा शो सोडत नाहीये..."
10
कश्मिरा शाहचा अपघात नक्की कसा झाला? नणंद आरती सिंहने दिली माहिती; म्हणाली, "मॉलमध्ये..."
11
Mohammed Shami च्या फिटनेस टेस्टसाठी BCCI नं सेट केला नवा पेपर
12
'हे' ७ फॉर्म्युले डोक्यात फिट करा, कमाईसोबतच तुमचा पैसाही वाढेल; लोकही विचारतील, "हे कसं केलं?"
13
मोदी-ठाकरे-पवार-शिंदेंनी मैदान गाजवलं; सोलापुरात कुठे कोणत्या नेत्याच्या सभा झाल्या? जाणून घ्या
14
27000 सैनिक तैनात, अनेक जिल्ह्यात कर्फ्यू, इंटरनेट बंद; मणिपूरमध्ये नेमकं काय घडतंय?
15
भयानक! समुद्रकिनारी बसलेल्या माय-लेकी, अचानक लाट आली अन्...; थरकाप उडवणारा Video
16
विशेष मुलाखत: "संविधानाचे संरक्षण व्हावे यासाठीच आम्ही महायुतीसोबत"
17
Defence Stocks : HAL सह 'या' ३ स्टॉक्सवर ब्रोकरेज बुलिश, ९५ टक्क्यांपर्यंत देऊ शकतात रिटर्न
18
महाराष्ट्राचं सरकार हे दिल्लीतून चालतंय, सुप्रिया सुळेंचा आरोप 
19
Maharashtra Election 2024 Live Updates: युगेंद्र यांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम, बारामतीमध्ये खळबळ
20
अनिल देशमुखांवरील हल्ला हे रचलेले कुंभाड; भाजपाचा संशय, आजच सखोल चौकशी करण्याची मागणी

Farmers Protest: शेतकरी आक्रमक, उखडले अडथळे; पोलिसांकडून रबरी गोळ्यांचा मारा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2024 5:40 AM

आंदोलकांना दिल्लीत येऊ न देण्यासाठी कडेकोट बंदोबस्त, शंभू सीमेवर धुमश्चक्री; अनेक शेतकरी जखमी

चंडीगड/नवी दिल्ली - Farmers Agitation in Delhi ( Marathi News ) किमान हमी भावाच्या कायद्यासह विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी ‘चलो दिल्ली’चा नारा देत मंगळवारी राजधानी दिल्लीकडे कूच केली. अपेक्षेनुसार त्यांना कडक सुरक्षा व्यवस्थेचा सामना करावा लागला. हरयाणात प्रवेश करण्यापूर्वीच दोन सीमांवर आंदोलकांना रोखले. बॅरिकेड्स तोडण्याचा प्रयत्न केल्यानंतर पोलिसांनी अश्रुधुराचा, तसेच रबरी गोळ्यांचा मारा केला. दिवसभर शेतकरी आणि पोलिसांमध्ये धुमश्चक्री सुरू होती. संध्याकाळी सूर्य मावळल्याने शेतकऱ्यांनी आंदोलन थांबवले; परंतु बुधवारी सकाळी पुन्हा दिल्लीकडे कूच करणार असल्याची घोषणा त्यांनी केली. 

संयुक्त किसान मोर्चा (गैरराजकीय) आणि किसान मजदूर संघांच्या नेतृत्वात अनेक शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. शेकडो ट्रॅक्टरसह सहा महिने पुरेल इतके जीवनावश्यक वस्तू घेऊन महिलांसह शेतकऱ्यांचा एक मोठा गट हरयाणाच्या सीमेपासून सुमारे ४० किमी अंतरावर असलेल्या पंजाबच्या फतेहगढ साहिब येथून सकाळी दहा वाजता निघाला. त्यांना रोखण्यासाठी लावलेले अडथळे शेतकऱ्यांनी उखडण्याचा प्रयत्न केल्यानंतर पोलिसांकडून बळाचा वापर करण्यात आला. रबरी गोळ्यांच्या माऱ्यामुळे अनेक शेतकरी जखमी झाले.

राहुल गांधी म्हणाले...‘शेतकरी बंधूंनो, आजचा दिवस ऐतिहासिक आहे! स्वामीनाथन आयोगानुसार प्रत्येक शेतकऱ्याला पिकांवर एमएसपीची कायदेशीर हमी देण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे. हे पाऊल १५ कोटी शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबीयांची समृद्धी सुनिश्चित करील. न्यायाच्या मार्गावर काँग्रेसची ही पहिली हमी आहे.  केंद्र सरकार शेतकऱ्यांशी चर्चा करण्याऐवजी त्यांच्यावर अश्रुधुराचा मारा करून तुरुंगात डांबत आहे.’ 

काँग्रेसने दिली ‘एमएसपी’ची हमीकाँग्रेसने ‘एमएसपी’ची कायदेशीर हमी देण्याचे आश्वासन देले आणि आपले हे आश्वासन क्रांतिकारक असून जनतेच्या पाठिंब्याने ते लवकरच प्रत्यक्षात येईल, असा विश्वास व्यक्त केला. छत्तीसगडमध्ये भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी हे आश्वासन दिले. 

एमएसपी कायदा घाईत आणता येणार नाहीपिकांना किमान आधारभूत किंमत (एमएसपी) हमी देणारा कायदा सर्व संबंधितांशी सल्लामसलत केल्याशिवाय घाईघाईत आणता येणार नाही. आंदोलक संघटनांनी केंद्र सरकारशी चर्चा करण्यासाठी पुढे यावे. चर्चेच्या दोन फेऱ्यांमध्ये आम्ही त्यांच्या अनेक मागण्या मान्य केल्या; पण काही मुद्यांवर सहमती झाली नाही. - अर्जुन मुंडा, केंद्रीय कृषिमंत्री

बॅरिकेड्स तोडण्यासाठी शेतकऱ्यांकडे बुलडोझर शेतकऱ्यांच्या ताफ्यात बॅरिकेड्स तोडण्यासाठी खोदकाम करणारे बुलडोझरही होते. त्याद्वारे सिमेंटच्या अडथळेही तोडण्यात आले. काही आंदोलकांनी धातूचे बॅरिकेड तोडून घग्गर नदीच्या पुलावरून फेकण्याचा प्रयत्न केला. काँक्रीटचे अडथळे हलवण्यासाठी आंदोलकांनी ट्रॅक्टरचाही वापर केला. तारांचे कुंपणही उखडून फेकण्यात आले.

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनCentral Governmentकेंद्र सरकार