शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान भारतीय किसान युनियन (बीकेयू) नेते राकेश टिकैत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. देशात मोठ्या भांडवलदार कंपन्या आहेत, ज्यांनी राजकीय पक्ष स्थापन केला आहे. त्यांनी हा देश ताब्यात घेतला आहे. अशा परिस्थितीत समस्या निर्माण होतील असं टिकैत यांनी म्हटलं आहे. जर शेतकऱ्यांवर अन्याय होत असेल आणि सरकार त्यांच्यासाठी काही समस्या निर्माण करत असेल तर ते शेतकरी आमच्यापासून दूर नाहीत आणि दिल्लीही आमच्यापासून दूर नाही असंही म्हटलं आहे.
शेतकऱ्यांच्या या आंदोलनात सध्या भारतीय किसान युनियनचा सहभाग नाही. याबाबत भारतीय किसान युनियनचे प्रवक्ते राकेश टिकैत म्हणाले की, "किसान युनियनने हा मोर्चा काढला आहे. या संघटनांनी पूर्वीच्या आंदोलनात स्वत:ला दूर ठेवले होते. यापैकी एकाही संघटनेने आमच्याशी संपर्कही साधला नाही. सर्वजण आपापल्या परीने कार्यक्रम करत आहेत. योग्य पद्धतीने केलं जात आहे."
"सरकार जे काही करत आहे ते चुकीचं आहे. चर्चेने प्रश्न सोडवला पाहिजे. सरकारने खिळे वगैरे वापरू नयेत. आपला 16 फेब्रुवारीला ग्रामीण भारत बंद आहे. त्यांना काही अडचण आली तर आम्हीही सक्रिय होऊ. शेतकऱ्यांना काही समस्या असेल तर आम्ही दिल्लीपर्यंत कूच करू. देशात अनेक संघटना आहेत. शेतकरी सीमेवर थांबवले जाऊ नये. त्यांना येऊ द्या. प्रत्येकाला येण्याचा अधिकार आहे."
नरेश टिकैत यांनीही शेतकऱ्यांना रोखण्यासाठी सरकारच्या व्यवस्थेवर जोरदार हल्लाबोल केला आहे. एबीपी लाइव्हशी बोलताना ते म्हणाले, "वेगवेगळ्या राज्यांच्या वेगवेगळ्या मागण्या आहेत. पण शेतकरी कायमच आंदोलन करणार का, ते नेहमीच दिल्लीकडे कूच करतील का? सरकारने याकडे लक्ष द्यावं. यामुळे कोणाचंच भलं होणार नाही."