एमएसपी कायद्यासह आपल्या मागण्यांवर ठाम असलेले शेतकरीदिल्लीच्या दिशेने येण्याची तयारी करत आहेत. मात्र या शेतकऱ्यांना राजधानीत येण्यापासून रोखण्यासाठी दिल्ली पोलीस सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. दिल्ली पोलिसांनी राजधानीच्या सर्व सीमा सील केल्या आहेत. टिकरी बॉर्डरवर पोलिसांनी रातोरात 40 मजुरांसह 10 फूट भिंत बांधली.
शेतकऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोनचा देखील वापर केला जात आहे. मंगळवारी पोलिसांनी ड्रोनचा वापर करून अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. मात्र यावर आता शेतकऱ्यांनी तोडगा काढला. 10 रुपये किमतीचे पतंग वापरून शेतकरी लाखो रुपये किंमत असलेला पोलिसांना ड्रोन खाली पाडत आहेत. शेतकऱ्यांना रोखण्यासाठी दिल्ली पोलीस ड्रोनमधून अश्रूधुराच्या नळकांड्या सोडत आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी ड्रोनचा सामना करण्याचा उपाय शोधला आहे.
शेतकऱ्यांनी पतंगाने ड्रोन खाली पाडण्याचा प्रयत्न केला. ड्रोनला खाली पाडणाऱ्या पतंगांचे व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यासोबतच ड्रोन पडल्यानंतर अश्रुधुराचा प्रभाव कमी करण्यासाठी शेतकरी त्यावर ओल्या गोण्या टाकत आहेत. शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे. टिकरी बॉर्डरवर पोलिसांनी 40 मजुरांच्या मदतीने 10 फूट उंच काँक्रीटची भिंत रातोरात उभारली.
दिल्ली आणि हरियाणामधील दोन प्रमुख सीमेवर पोलिसांनी वाहतूक रोखली. तर उत्तर प्रदेशच्या गाझीपूर बॉर्डरवर सुरक्षा जवानांच्या देखरेखीखाली काही गोष्टींसाठी परवानगी देण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलीस अधिक दक्षता घेत आहेत. हरियाणा पोलिसांनी आंदोलक शेतकऱ्यांना पंजाब आणि हरियाणामधील शंभू बॉर्डरवर अंबालाजवळ रोखलं आहे. दिल्लीतही पोलिसांनी संसदेकडे आणि इतर संवेदनशील ठिकाणी जाणाऱ्या अनेक रस्त्यांवर बॅरिकेड्स लावले आहेत.